शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

काळ््या खणीचा प्रकल्प ३० कोटींवर

By admin | Updated: June 28, 2015 00:33 IST

महापालिका : नव्या प्रस्तावाचे काम सुरू, दोन दिवसांत केंद्राकडे सादर होणार

सांगली : केंद्रीय तलाव संवर्धन योजनेअंतर्गत सांगलीच्या काळी खण तलावाच्या सुशोभिकरणाची फाईल केंद्रीय पर्यावरण मंत्रालयातून हरवली असल्याने महापालिका प्रशासनाने नवीन प्रस्तावाचे काम हाती घेतले आहे. चालू दरसूचीनुसार सुधारित प्रकल्प आता २७.१८ कोटींवरून ३० कोटींवर जाण्याची चिन्हे आहेत. येत्या दोन दिवसात प्रकल्पाचा नवा प्रस्ताव महापालिकेचे अधिकारी स्वहस्ते दिल्लीतील विभागाला जमा करणार आहेत. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचे एक पत्र महापालिकेत गत सोमवारी आल्यानंतर महापालिकेला धक्का बसला. काळ््या खणीची फाईलच मिळाली नसल्याचा उल्लेख या पत्रात होता. महापालिकेला फेरप्रस्ताव सादर करण्याचे आदेश मंत्रालयाने दिल्याने आता कागदपत्रांची जुळवाजूळव सुरू झाली आहे. महापालिकेने यापूर्वी राज्य शासनाकडे दोनवेळा या प्रकल्पाची फाईल पाठविली होती. राज्य शासनाने ही फाईल केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे सादर केल्याचेही सांगितले होते. तसे पत्रही राज्य शासनाने महापालिकेला पाठविले होते. याशिवाय महापालिकेनेही स्वतंत्रपणे प्रकल्पाची फाईल केंद्र शासनाकडे पोस्टलद्वारे पाठविली होती. याची पोहोच पावतीही महापालिकेला प्राप्त झालेली आहे. तरीही मंत्रालयाने फाईल मिळत नसल्याचे सांगितले आहे. गेल्या दहा वर्षांपासून काळी खण सुशोभिकरणाच्या प्रकल्पासाठी प्रयत्न सुरू आहेत. सुरुवातीला मदन पाटील यांच्या सत्ताकाळात हा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यानंतर महाआघाडी सत्तेवर असताना याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे पाठविण्यात आला होता. शहरातील पुष्पराज चौकाजवळ सुमारे १० हेक्टर क्षेत्रात काळी खण असून, त्यातील पाण्याची सरासरी उंची साडेसहा मीटर आहे. या तलावाचे संवर्धन करण्यासाठी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय तलाव संवर्धन विभागाकडे सुरुवातीला २२ कोटींचा प्रकल्प अहवाल सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला केंद्राने प्राथमिक मान्यताही दिली. पण न्यायालयीन वादामुळे महापालिकेला निधी प्राप्त होऊ शकला नाही. त्या प्रकल्पाचे २५ कोटींचे दुरूस्ती अंदाजपत्रक केंद्राला सादर झाले. पण २०१३-१४ ची दरसूची लागू झाल्यानंतर प्रकल्पाचा खर्च आणखी तीन कोटीने वाढला. २७.१८ कोटींच्या प्रस्तावाला राज्याच्या पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी दिली होती. सध्या हा प्रस्ताव केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे मंजुरीच्या अंतिम टप्प्यात होता. केंद्रातील सरकार बदलल्यानंतर महापालिकेने या प्रकल्पाबाबत स्मरणपत्र पाठविले होते. त्यानंतर याबाबत कोणताही पाठपुरावा करण्यात आला नव्हता. (प्रतिनिधी)