सांगली : पेट्रोल, डिझेल आणि रेल्वे दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे आज आंदोलन करण्यात आले. कॉँग्रेस कमिटीपासून म. गांधी पुतळ्यापर्यंत कार्यकर्त्यांनी दुचाकी ढकलून नेऊन सरकारचा निषेध नोंदविला. जिल्ह्यातही विविध ठिकाणी काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. इस्लामपूर, कडेगाव, कवठेमहांकाळ, आटपाडी येथेही केंद्र शासनाचा निषेध करण्यात आला. केंद्र सरकारतर्फे पेट्रोल, डिझेल तसेस रेल्वेच्या तिकिटांमध्ये वाढ करण्यात आली आहे. याचा भार सामान्य जनतेवर पडला आहे. त्यामुळे महागाईत भर पडली आहे. त्याच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे आज आंदोलन करण्यात आले. काँग्रेस कमिटीसमोरुन काँग्रेस कार्यकर्त्यांनी दुचाकी ढकलून म. गांधी चौकापर्यंत नेल्या. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाही देण्यात आल्या. आंदोलनाचे नेतृत्व शहर जिल्हाध्यक्ष मुन्ना कुरणे, मिरज शहर अध्यक्ष रफिक मुजावर यांनी केले. यावेळी सेवादल जिल्हाध्यक्ष अजित ढोले, राजन पिराळे, करीम मेस्त्री, शैलेंद्र सॅमसंग, सचिन चव्हाण, पैगंबर शेख, चंद्रकांत पवार आदींसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनात युवक काँग्रेस, एन.एस.यु.आय. अल्पसंख्याक सेल, मागासवर्गीय सेलचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. इस्लामपूर : महागाईचा निषेध म्हणून युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शहरातील मुख्य रस्त्यावरून दुचाकी वाहने चालवत नेण्याऐवजी पेट्रोलचा वापर न करता ढकलत नेऊन निषेध नोंदवला. मोदी सरकारच्या करणी व कथनीमधील फरक जनतेच्या निदर्शनास आणून देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात जिल्हा उपाध्यक्ष जयकर कदम, हातकणंगले युवकचे अध्यक्ष जयराज पाटील, अॅड. आर. आर. पाटील, धनंजय कुलकर्णी, राजू सावकर, महेश चौधरी, क्रांती जाधव, पोपट घोगावकर, विशाल पाटील, स्वप्निल इटकरकर, शीतल बोटकर सहभागी झाले होते. कडेगाव : कडेगाव येथे दुचाकी ढकलून मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. आज रविवारी सकाळी ११ वाजता कडेगाव तालुका काँग्रेस कमिटी कार्यालयापासून ही रॅली सुरू झाली. केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत ही रॅली बसस्थानक चौकात आली व रॅलीची सांगता झाली.कडेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा मालन मोहिते, युवा नेते जितेश कदम, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इंद्रजित साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘कहाँ गये अच्छे दिन, बुरे दिन आ गये’ अशा घोषणा दिल्या. यावेळी कडेगावचे सरपंच विजय शिंदे, विनायक पवार, मंगल सूर्यवंशी, अजय पाटील, विठ्ठल मुळीक, सखाराम सूर्यवंशी, सुनील पाटील, चिंचणीचे सरपंच अशोक महाडिक आदी उपस्थित होते.आटपाडी : केंद्र सरकारने डिझेल आणि पेट्रोलच्या दरात वाढ केल्याच्या निषेधार्थ आटपाडीत आज, रविवारी काँग्रेसच्यावतीने दोरीने वाहने ओढून निषेध करण्यात आला. बसस्थानकापासून इंधन दरवाढीच्या निषेधार्थ घोषणा देत दोरीने वाहने ओढत आणि पेट्रोलविना दुचाकी ढकलत काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अनोखे आंदोलन केले. आटपाडी ग्रामपंचायत कार्यालयासमोरील चौकात आंदोलकांनी केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात भाषणातून संताप व्यक्त केला. आंदोलनात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वसंतराव गायकवाड, युवा काँग्रेसचे राहुल गायकवाड, अॅड. विलासराव देशमुख, प्रभाकर पाटील, सुहास पाटील, डी. एम. पाटील, जयदीप भोसले, नंदकुमार दबडे, गणपतराव काटकर, मोहन देशमुख, गणेश गायकवाड, यशवंत गायकवाड, केशव गायकवाड, पी. एन. कदम, मोहन खरात,अण्णासाहेब मोरे, सचिन गुरव, ऋषिकेश गुरव यांनी सहभाग घेतला. कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ येथे आज (रविवार) काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दुचाकी ढकलत नेऊन दरवाढीविरोधात तहसीलदारांना निवेदन दिले. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चक्क दुचाकी गाड्या ढकलत नेल्या आणि यापुढे या सरकारमुळे गाड्या ढकलण्याचीच वेळ येते की काय, असे दाखवून दिले. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, बाळासाहेब गुरव यांची भाषणे झाली. तहसीलदारांना पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढ मागे घ्यावी, अशा आशयाचे निवेदन दिले. यावेळी कार्याध्यक्ष अरविंद शिंदे, माणिकराव भोसले, भीमसेन भोसले, मोहन लोंढे, वैभव गुरव, पोपट पाटील, अनिल पाटील, चैतन्य पाटील, नानासाहेब पाटील, तुषार वनखडे, धनाजी गरड, भारत डुबुले, प्रशांत कांबळे उपस्थित होते. (वार्ताहर)
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा जिल्ह्यात निषेध
By admin | Updated: July 7, 2014 00:46 IST