शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या नोटा बुडीत खाती धरण्यास स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 00:13 IST

सांगली : नोटाबंदीनंतर कालबाह्य ठरलेल्या शिल्लक नोटा जिल्हा बँकांनी बुडीत खाती जमा करण्याच्या ‘नाबार्ड’ने दिलेल्या आदेशास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी स्थगिती दिली. त्यामुळे राज्यातील आठ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना तूर्त दिलासा मिळाला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी चार आठवड्यांनंतर होणार आहे.पाचशे व हजार रुपयांच्या नोटाबंदीचा निर्णय ८ नोव्हेंबर २०१६ रोजी जाहीर ...

सांगली : नोटाबंदीनंतर कालबाह्य ठरलेल्या शिल्लक नोटा जिल्हा बँकांनी बुडीत खाती जमा करण्याच्या ‘नाबार्ड’ने दिलेल्या आदेशास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी स्थगिती दिली. त्यामुळे राज्यातील आठ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना तूर्त दिलासा मिळाला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी चार आठवड्यांनंतर होणार आहे.पाचशे व हजार रुपयांच्या नोटाबंदीचा निर्णय ८ नोव्हेंबर २०१६ रोजी जाहीर झाला. मात्र, त्यापूर्वीच जिल्हा बँकेत जमा असलेल्या पाचशे व हजार रुपयांच्या नोटाही या निर्णयामुळे अडकल्या. नोटाबंदीनंतरच्या व पूर्वीच्या अशा सर्वच रकमा जवळपास वर्षभर जिल्हा बँकांमध्ये पडून राहिल्या. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने केवळ ८ नोव्हेंबरनंतर जमा झालेल्याच नोटा स्वीकारण्याचे धोरण जाहीर केले. जिल्हा बँकांनी संबंधित रकमा जमाही केल्या. मात्र, राज्यातील आठ जिल्हा बँकांकडे ८ नोव्हेंबरपूर्वीच्या ११२ कोटींच्या नोटा तशाच शिल्लक आहेत. त्यामध्ये सांगली जिल्हा बँकेसह पुणे, कोल्हापूर, अहमदनगर, नाशिक, वर्धा, नागपूर आणि अमरावती या बँकांचा समावेश आहे. रिझर्व्ह बँकेकडे पाठपुरावा करूनही ही रक्कम स्वीकारली जात नसल्याने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.याचिकेवरील सुनावणी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती अर्जन कुमार शिक्री व न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या खंडपीठासमोर झाली. बँकांची चूक नसताना त्यांनी तोटा का सहन करायचा?, असा प्रश्न उपस्थित करून या निर्णयाला स्थगिती द्यावी अशी विनंती जिल्हा बँकांच्या वकिलांनी केली. न्यायालयाने ती मान्य करून पुढील सुनावणी चार आठवड्यांनंतर होईल, असे स्पष्ट केले.‘नाबार्ड’ने ३० जानेवारी २०१८ रोजी या आठही जिल्हा बॅँकांना एक पत्र पाठवून, या शिल्लक रकमा बुडीत खाती जमा करण्याचे आदेश दिले होते.‘नाबार्ड’च्या या आदेशाला स्थगिती मिळाली असल्याने शिल्लक असलेल्या जुन्या नोटा अंदाजपत्रकात समाविष्ट केल्या जातील. त्यामुळे तितक्या रकमेचा तोटा आता दिसणार नाही.या जिल्हा बँकांकडे आहेत जुन्या नोटा...कालबाह्य ठरलेल्या पाचशे व हजार रुपयांच्या नोटांच्या माध्यमातून सांगली जिल्हा बँकेकडे १४.७२ कोटी, पुणे बँकेकडे २२.२५ कोटी, वर्धा बँकेकडे ७९ लाख, नागपूर बँकेकडे ५.0३ कोटी, अहमदनगर बँकेकडे ११.६0 कोटी, अमरावती बँकेकडे ११.0५ कोटी, कोल्हापूर बँकेकडे २५.२८ कोटी आणि नाशिक जिल्हा बँकेकडे २१.३२ कोटी, अशा रकमा शिल्लक आहेत. शिल्लक असलेली सर्व रक्कम अनुत्पादित असल्याने त्याच्या व्याजाच्या रूपानेही फटका बसणार आहे.