शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

‘नागबंदी’च्या निषेधार्थ शिराळ्यात कडकडीत बंद

By admin | Updated: July 16, 2014 23:38 IST

तहसीलदार विजया यादव यांना निवेदन

शिराळा (जि. सांगली) : नागपंचमीसाठी जिवंत नाग पकडू नयेत, जिवंत नागाची पूजा करू नये, असा आदेश उच्च न्यायालयाने दिल्याच्या निषेधार्थ आज, बुधवारी शिराळा शहर बंद ठेवण्यात आले. या निर्णयास स्थगिती मिळेपर्यंत बेमुदत बंद व लढा देण्याचा निर्णय सर्व नागराज मंडळ, नागरिकांनी घेतला आहे. प्रशासनाने या निर्णयाबाबत येथील जनतेच्या भावना कळवाव्यात, असे निवेदन तहसीलदार विजया यादव यांना देण्यात आले.नागपंचमीसाठी जिवंत नाग पकडण्यास आणि पूजा करण्यास परवानगी मिळावी, अशी याचिका शिराळा ग्रामपंचायतीने न्यायालयात दाखल केली होती. त्यावर मंगळवार, दि. १५ जुलैरोजी न्यायमूर्ती एस. ए. चांदोलकर व अभय ओक यांच्या खंडपीठाने ती याचिका फेटाळून लावत जिवंत नाग पकडणे, त्याची पूजा करणे, मिरवणूक काढणे यावर बंदीचा निर्णय दिला. या निर्णयानंतर शिराळा शहरातील नागरिक, भाविक, नाग मंडळांचे कार्यकर्ते यांच्यात संतापाची लाट पसरली आहे. आज शिराळा शहर बंद ठेवण्यात येऊन मोर्चाद्वारे तहसीलदार विजया यादव यांना निवेदन देण्यात आले. यावेळी त्यांनी या भावना वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्याचे आश्वासन दिले.या मोर्चाचे नंतर बैठकीत रूपांतर झाले. ग्रामदैवत अंबामाता मंदिरात ही बैठक झाली. यावेळी पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांनी शांततेत बंद पाळावा, न्यायालयाचा मान राखावा, असे आवाहन केले.