कसबे डिग्रज : गेली दोन वर्षे कोरोनाकाळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सातत्याने डॉक्टर्स, नर्सेस, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, शिक्षक-शिक्षिका, ग्रामपंचायत कर्मचारी हे कोरोना लढाईत मोठ्या हिमतीने काम करत आहेत. त्यांचे मानसिक मनोबल आणि कामाचा उत्साह वाढावा, यासाठी कसबे डिग्रजमध्ये व्याख्याते वसंत हंकारे यांचा प्रबोधनाचा व मनोरंजनाचा कार्यक्रम झाला.
वसंत हंकारे गेले अनेक दिवस वेगवेगळ्या कोविड सेंटर व अलगीकरण कक्षामध्ये कोरोना रुग्णांचे मनोबल वाढवण्यासाठी कार्यक्रम घेत आहेत. परंतु, पहिल्यांदाच कोरोना योद्ध्यांसाठी एक विशेष कार्यक्रम घेण्याचा उपक्रम कसबे डिग्रजमध्ये राबवण्यात आला.
सध्या डॉक्टर, नर्सेस, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, शिक्षक-शिक्षिका तसेच ग्रामपंचायत कर्मचारी गेले अनेक दिवस कोरोना रुग्णांचे मनोबल वाढवण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत. यामुळे हे कोरोना योद्धे खऱ्या अर्थाने समाजासाठी देवदूत बनले असल्याची प्रतिक्रिया यावेळी वसंत हंकारे यांनी दिली.
जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले, तलाठी के. ल. रूपनर, ग्रामविकास अधिकारी डी. आर. शिंदे, कुमार लोंढे, संजय शिंदे, प्रमोद चव्हाण, मनोज कोळी आदी उपस्थित होते.