शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
3
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
4
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
5
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
6
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
7
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
8
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
9
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
10
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
11
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
12
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
13
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
14
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
15
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
16
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
17
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
18
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
19
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
20
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले

प्राध्यापकांची संघर्ष समिती स्थापन

By admin | Updated: March 16, 2015 00:04 IST

मिरजेत मेळावा : विनाअनुदानित व तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना नियुक्ती व वेतनाची मागणी

मिरज : विनाअनुदानित व तासिका तत्त्वावरील वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांना कायमस्वरूपी नियुक्ती व वेतनाच्या मागणीसाठी शासनासोबत संघर्ष करण्याचा निर्णय मिरजेतील मेळाव्यात घेण्यात आला. माजी आमदार शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली तासिका तत्त्वावरील व कायम विनाअनुदानित प्राध्यापक संघर्ष कृती समितीची स्थापना करण्यात आली. मिरज महाविद्यालयात आयोजित प्राध्यापकांच्या मेळाव्यात जिल्ह्यातील विविध संस्थांमध्ये तासिका तत्त्वावर व विनाअनुदानित तत्त्वावर काम करणारे प्राध्यापक उपस्थित होते. तासिका तत्त्वावरील प्राध्यापक पूर्णवेळ वर्षभर काम करतात. परीक्षा, नॅक मानांकन यासह अनेक शैक्षणिक कामांना त्यांना जुंपण्यात येते. मात्र त्यांना अत्यंत तुटपुंजे वेतन देण्यात येते. तासाला २४० रूपये व मासिक ६ हजार ७०० रूपये तासिका तत्त्वावर काम करणाऱ्यांची संख्या मोठी असतानाही प्राध्यापकांच्या निवृत्तीचे वय ६२ करण्याच्या हालचाली सुरू आहेत. पात्रताधारक प्राध्यापक उपलब्ध असताना, प्राध्यापकांच्या निवृत्तीचे वय वाढविण्यात येऊ नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तासिका तत्त्वाप्रमाणेच कायमस्वरूपी विनाअनुदानित महाविद्यालयात काम करणाऱ्या प्राध्यापकांची अवस्था दयनीय आहे. विनाअनुदानित संस्थांना अनुदान देऊन येथे पूर्वीपासून काम करणाऱ्या शिक्षकांना सेवेत घ्यावे, प्राध्यापकांच्या रिक्त जागा भराव्यात, तासिका तत्त्वावरील नियुक्त्यांना शासनमान्यता देऊन कर्नाटकप्रमाणे दरमहा १६ हजार रूपये वेतन द्यावे आदी विविध मागण्या करण्यात आल्या. दहा ते पंधरा वर्षे काम करणाऱ्या प्राध्यापकांना नोकरीत स्थैर्य नसल्याने त्यांची अवस्था बिकट झाली आहे. शिक्षण क्षेत्रातील या वंचित घटकासाठी संघर्ष करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रा. शरद पाटील यांनी सांगितले. कौटुंबिक व मानसिकदृट्या स्थिर नसलेल्या अध्यापकांच्या कामावर परिणाम होत असल्याचे सांगितले. यावेळी संघर्ष कृती समितीची स्थापना करून अध्यक्षपदी प्रा. लक्ष्मण शिंदे, कार्यवाहपदी अभिजित तवटे, विनायक पवार, प्रा. डॉ. अल्का पाटील, तर उपाध्यक्षपदी प्रा. नितीन सावंत यांची निवड करण्यात आली. तसिका तत्त्वावरील व विनाअनुदानित तत्त्वावरील प्राध्यापकांच्या मागण्यांसाठी प्रा. शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली कृती समितीचे पदाधिकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षणमंत्र्यांची भेट घेणार आहेत. यासाठी आजपासूनच नियोजन सुरु करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. (वार्ताहर)