शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ता जप्तीची प्रक्रिया मंदगतीने

By admin | Updated: January 22, 2017 23:41 IST

वसंतदादा बॅँक घोटाळा : अभिलेखात अद्याप नाव नाही

ंसांगली : अवसायनातील वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँकेतील २४७ कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी २८ माजी संचालक, वारसदार आणि माजी अधिकाऱ्यांच्या मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आली असली तरी, मालमत्तांच्या अभिलेखात बॅँकेच्या चौकशी अधिकाऱ्यांचे नाव लागण्याची प्रक्रिया कासवगतीने सुरू आहे. त्यामुळे याचा फायदा घेऊन मालमत्ता हस्तांतरणाचा धोका वाढला आहे. अवसायनातील वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेतील २४७ कोटी ७५ लाख ५४ हजार रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी मागील आठवड्यात २३ माजी संचालक, तीन मृत माजी संचालकांचे ३ वारसदार आणि दोन अधिकारी अशा २८ जणांच्या स्थावर मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. मालमत्ता अभिलेखात प्राधिकृत चौकशी अधिकारी, वसंतदादा शेतकरी सहकारी बँक अशी नोंद करण्याचे आदेशही दिले आहेत. महसूल विभागाकडून याबाबतची प्रक्रिया सुरू असली तरी, ती गतीने होत नाही. जलदगतीने नाव नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्याची विनंतीही चौकशी अधिकाऱ्यांनी केली असताना, अद्याप त्याबाबत कोणत्याही हालचाली दिसत नाहीत. अजूनही एकाही मालमत्तेच्या अभिलेखात वसंतदादा बॅँकेचे नाव लागलेले नाही. काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील, नगरसेवक सुरेश आवटी, माजी महापौर सुरेश पाटील यांच्यासह दिग्गज नेत्यांच्या मालमत्ता जप्तीच्या आदेशाने जिल्ह्यात खळबळ माजली आहे. सहकारी बँकिंग क्षेत्रात एकेकाळी मोठा दबदबा असणाऱ्या या बँकेतील तत्कालीन संचालक, अधिकाऱ्यांनी नियमबाह्य व असुरक्षित कर्जवाटप मोठ्या प्रमाणावर केले. तीनशे कोटींहून अधिकच्या कर्ज प्रकरणांत आक्षेप नोंदविण्यात आले होते. कलम ७२ (३) प्रमाणे अंतिम झालेल्या चौकशीत १०७ खात्यांमधील २४७ कोटी ७५ लाखांच्या रकमेबाबत आता आरोप ठेवण्यात आले होते. दोषारोप पत्रावरील सुनावणीचे काम अंतिम टप्प्यात आले असतानाच, या प्रकरणातील काँग्रेसच्या एका नेत्याने त्याची मालमत्ता विक्रीस काढली होती. त्याविषयीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची दखल चौकशी अधिकाऱ्यांनी घेतली. भविष्यातील वसुलीच्या कारवाईस अडथळा निर्माण होत असल्याची बाब निदर्शनास आल्याने, चौकशी अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र सहकारी अधिनियम १९६० च्या कलम ८८ व ९५ मधील तरतुदीनुसार प्रकरणातील माजी संचालकांच्या व अधिकाऱ्यांच्या मालमत्ता जप्तीचे आदेश दिले. यासंदर्भातील आदेशाची प्रत रैनाक यांनी जिल्हा उपनिबंधकांसह महसुली अधिकाऱ्यांना दिली आहे. संबंधित मालमत्तांच्या विक्री, हस्तांतर, तारणगहाण, भाडेपट्टी अशा कोणत्याही प्रकारच्या व्यवहाराला मनाई करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)वसुलीचा दावा : अन्य बॅँकांच्यानंतरचाबहुतांश माजी संचालकांच्या मालमत्तांवर अन्य बँकांचे बोजे दिसत आहेत. त्यामुळे भविष्यात वसुली करताना दावेदारीत वसंतदादा बँकेचा क्रमांक शेवटचा असणार आहे. त्यामुळे जप्तीच्या कारवाईमुळे अजूनही वसुलीची चिंता मिटलेली नाही. अन्य बॅँकांच्या वसुलीच्या कारणाआडही वसंतदादा बॅँकेच्या वसुलीला बाधा पोहोचू शकते.