शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

अधीक्षकांसह तिघांविरुद्ध फिर्याद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2016 23:52 IST

सांगलीतील प्रकरण : बिअरबार परवानाप्रकरणी सुधार समितीची पोलिसांत धाव

सांगली : शंभरफुटी रस्त्यावरील गुलाब कॉलनीतील बिअरबार परमिट रूमला देण्यात आलेली बेकायदेशीर परवानगी राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षकांसह तीन अधिकाऱ्यांच्या चांगलीच अंगलट आली आहे. सांगली जिल्हा सुधार समितीने नोटीस देऊनही बिअर बारला दिलेली परवानगी रद्द न केल्याने, समितीच्यावतीने या तीन अधिकाऱ्यांविरुद्ध शनिवारी रात्री विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली आहे. फिर्याद दिलेल्यांमध्ये अधीक्षक प्रकाश गोसावी, निरीक्षक सुरेश चौगुले व दुय्यम निरीक्षक रामचंद्र पुजारी यांंचा समावेश आहे. कर्तव्यात कसूर, शासकीय दफ्तरी चुकीच्या नोंदी करणे, शासनाची फसवणूक करणे, कागदपत्रात अफरातफर करणे या कलमांन्वये त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या अधिकाऱ्यांनी संगनमत करुन गुलाब कॉलनीतील महानंदा कोळेकर यांना बिअरबार परमिट रुमला परवाना मिळवून देण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करुन शासनाची फसवणूक केली आहे. गुलाब कॉलनीत गणेश मंदिर व मूकबधिर मुलांची शाळा असल्याने नागरिकांनी व सुधार समितीने बिअरबारला विरोध केला होता. पण या अधिकाऱ्यांनी तरीही जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल पाठवून परवाना मिळवून दिला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.समितीचे अ‍ॅड. अमित शिंदे यांनी गुलाब कॉलनीतील रवींद्र काळोखे, सुरेश पाटील, विवेक माने या अशिलांमार्फत गेल्या आठवड्यात अधिकाऱ्यांना नोटीस बजावली होती. कोळेकर यांना कशाप्रकारे हॉटेलची परवानगी दिली, याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावी, तसेच हॉटेलचा परवाना नोटीस पोहोचल्यापासून सात दिवसात रद्द करावा, अन्यथा तुमच्यावर कारवाई केली जाईल, असा नोटिसीद्वारे इशारा दिला होता. (प्रतिनिधी) मी सध्या रजेवर आहे. नेमके प्रकरण काय झाले आहे, याची माहिती नाही. तरीही याची चौकशी सुरू आहे. रजेवरून आल्यानंतर माहिती घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल.- प्रकाश गोसावी, अध्ीाक्षकराज्य उत्पादन शुल्क, सांगलीगुन्हा दाखल करा : ... अन्यथा न्यायालयातअ‍ॅड. अमित शिंदे व आर्किटेक्ट रवींद्र चव्हाण म्हणाले, पोलिसांनी फिर्याद दाखल करण्यासाठी प्रत दिली आहे. पण त्यांनी गुन्हा दाखल केलेला नाही. उत्पादन शुल्कचे तीनही अधिकारी शासकीय नोकरदार आहेत. त्यामुळे या प्रकरणाची प्रथम चौकशी केली जाईल. त्यानंतर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे पोलिसांनी सांगितले. पण जरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही, तर आम्ही या तीन अधिकाऱ्यांविरुद्ध न्यायालयात गुन्हा दाखल करणार आहोत.