शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

राज्यकर्त्यांच्या नकारात्मक भूमिकेमुळेच विकासात अडचण

By admin | Updated: April 12, 2016 00:35 IST

नानासाहेब पाटील : शहरांच्या मूलभूत सुधारणांकडे लक्ष देण्याची गरज--नेमगोंडा पाटील व्याख्यानमाला

सांगली : शहरांचा विकास व्हावा आणि त्या विकासातून राज्याच्या उत्पन्नात भर पडावी यासाठी राज्यकर्त्यांनी भूमिका घेणे आवश्यक आहे. आगामी काही वर्षांचा विचार केला, तर देशाच्या विकासात शहरांचे महत्त्व अधोरेखित होणार असल्याने, राज्यकर्त्यांनी शहरांच्या विकासासाठी योगदान देणे आवश्यक असले तरी, दुर्दैवाने त्यांची भूमिकाच शहरांच्या विकासात अडचण ठरत असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी अप्पर मुख्य सचिव नानासाहेब पाटील यांनी सोमवारी केले. नेमगोंडा दादा पाटील स्मृती व्याख्यानमालेत ‘स्मार्ट सिटी खरोखरच अस्तित्वात येईल काय?’ या विषयावर पाटील बोलत होते. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, सुरेश पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. पाटील म्हणाले की, राज्याचा विचार करता, ५२ टक्के उत्पन्न हे केवळ मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे या शहरांतून मिळत आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि प्रगत राज्य असणाऱ्या महाराष्ट्रातील शहरांचा विकास व्हावयाचा असेल, तर शहरांतील महानगरपालिका सक्षम झाल्या पाहिजेत. विद्यमान सरकारने जकात हटविण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा असून महापालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत यामुळे हटणार आहे. विदेशात कर गोळा करण्यासाठी वेगवेगळे स्रोत वापरण्यात येतात. त्याचा अवलंब करण्यात आला पाहिजे. नागरिकांचा शहरांकडे ओढा वाढत असून, त्यांना सुविधा पुरविण्याची कसरत महापालिकांना करावी लागणार आहे. देशाचे उत्पन्न ४०० टक्क्यांपर्यंत वाढविण्याची क्षमता शहरांत असल्याने राज्यकर्त्यांनी मानसिकता बदलत शहरांचा विकास साधला, तर स्मार्ट सिटीची संकल्पना प्रभावी ठरणार आहे. (प्रतिनिधी)