शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

विट्यातील पडळकरसमर्थक कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:28 IST

इस्लामपूर : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे समर्थक, विट्याचे युवा नेते राजू जानकर, प्रा. नारायण खरजे यांनी ...

इस्लामपूर : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे समर्थक, विट्याचे युवा नेते राजू जानकर, प्रा. नारायण खरजे यांनी प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. राजू जानकर यांची युवक राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस व प्रा. नारायण खरजे यांची प्रदेश सचिवपदी निवड करण्यात आली. दोन्ही नूतन पदाधिकाऱ्यांनी राजारामबापू कारखाना कार्यस्थळावर राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, तालुकाध्यक्ष विजयराव पाटील यांनी जानकर व प्रा. खरजे यांचे कारखाना कार्यस्थळावर सत्कार केला. यावेळी अवधूत कस्तुरे (बलवडी), प्रा. प्रवीण गावडे (इस्लामपूर), हॅन्डबॉल प्रशिक्षक शशिकांत पवार प्रामुख्याने उपस्थित होते.

राजू जानकर म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यांनी आम्हास राज्य पातळीवर काम करण्याची संधी देऊन आमच्यावर जो विश्वास दाखविला आहे, तो जोरदार काम करून सार्थ करून दाखवू. प्रा. खरजे म्हणाले, समाजाचे, युवकांचे प्रश्न राहिले बाजूला, आमच्या नेत्याची फक्त स्टंटबाजी चालू होती. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली गोर-गरीब कुटुंबातील युवकांच्या हाताला काम देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभा करण्याचा प्रयत्न करू.

फोटो : ०२ इस्लामपुर १

ओळी : राजारामनगर येथे राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यास युवक राष्ट्रवादीचे नूतन प्रदेश सरचिटणीस राजू जानकर व प्रदेश सचिव प्रा. नारायण खरजे यांनी अभिवादन केले. यावेळी बाळासाहेब पाटील, विजयराव पाटील, अवधूत कस्तुरे, प्रा. प्रवीण गावडे उपस्थित होते.