शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
4
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
5
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
6
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
7
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
8
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
9
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
10
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
11
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
12
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
13
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
14
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
15
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
16
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
17
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
18
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
19
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
20
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!

बक्षीसपात्र गावांना उपक्रमाचा विसर!

By admin | Updated: September 6, 2016 23:50 IST

संख्या घटली : जिल्ह्यात १२५ गावातच ‘एक गणपती’

सचिन लाड-- सांगली --जिल्हा प्रशासन व पोलिस यंत्रणा राबवित असलेल्या ‘एक गाव एक गणपती’ या उपक्रमास यावर्षी अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यातील ७१९ पैकी केवळ १२५ गावांनी एकत्रित येऊन ‘एक गाव एक गणपती’ बसविला आहे. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाचे बक्षीस घेतल्यानंतर अनेक गावांना या उपक्रमाचा विसर पडल्याने, अशा गावांची संख्या घटल्याचे चित्र आहे. पोलिसांनी प्रयत्न करुनही गावे या उपक्रमात सहभागी झाली नाहीत.गणेशोत्सवातील खर्च कमी व्हावा, वर्गणीची कोणावर सक्ती होऊ नये, लोकवर्गणीतून जमा झालेली रक्कम गावाच्या विधायक कामासाठी खर्च व्हावी, गाव म्हटले की गट-तट आले, यातून गणेश आगमन व विसर्जन मिरवणुकीत मारामारी होऊ नये, पोलिसांवरील बंदोबस्ताचा ताण कमी व्हावा, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी ‘एक गाव एक गणपती’ची संकल्पना राबविली जात आहे. तसेच पोलिस ठाण्यापासून अनेक गावे २५ ते ३० किलोमीटरवर आहेत. एखादा अनुचित प्रकार घडला, तर तिथे पोलिसांना पोहोचण्यास किमान अर्धा तास तरी लागतो. यासाठी पंधरा वर्षांपूर्वी जिल्हा प्रशासन व पोलिसांनी पुढाकार घेऊन हा उपक्रम सुरु केला. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छताअभियान व महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान सुरु झाल्यानंतर या उपक्रमाचा अनेक गावांनी स्वीकार केला. मात्र बक्षीस घेतल्यानंतर अनेक गावे उपक्रमातून बाहेर पडली असल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते. गतवर्षी १४० गावांतील ग्रामस्थांनी एकत्रित येऊन ‘एक गणपती’ बसविला होता. महात्मा गांधी तंटामुक्त अभियानात जिल्ह्याने २००८-०९ मध्ये प्रथम क्रमांक पटकाविला होता. त्यावेळी २००९ मध्ये २४५ गावांत ‘एक गाव एक गणपती’ बसविण्यात आला होता. त्याच्या दुसऱ्यावर्षी २०१० मध्ये तर सुमारे ३०२ गावांत हा उपक्रम राबविण्यात आला होता. पण त्यानंतर मात्र ही संख्या घटतच गेली. योजनेची आकडेवारी...वर्ष गावे२००५ : ७६२००६ : ८५२००७ : १४५२००८ : ३३४२००९ : २४५२०१० : ३०२२०११ : १९४वर्ष गावे२०१२ : २०५२०१३ : १५१२०१४ : १२४२०१५ : ११०२०१६ : १२५