कुंडल : ऊस तोडणी कामगारांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे हे कर्तव्य मानून आरोग्य शिबिराचे दरवर्षी आयोजन केले जाते, असे मत जिल्हा बँकेचे संचालक किरण लाड यांनी व्यक्त केले.
कुंडल (ता. पलूस) येथील क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्यात कुंडल प्राथमिक आरोग्य केंद्राकडून सर्वरोग निदान शिबिर पार पडले, यावेळी लाड बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, उपाध्यक्ष उमेश जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या शिबिरात कामगारांच्या रक्ताच्या विविध तपासण्या, ईसीजी काढण्यात आले. कानाची व डोळ्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी शरद लाड म्हणाले, कोणताही आजार असो कामगारांनी त्याकडे दुर्लक्ष करू नये. त्याचे भविष्यात मोठे दुष्परिणाम होऊ शकतात. जास्तीत जास्त कामगारांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
यावेळी डॉ. किरण भोरे, संचालक संदीप पवार, कुंडलिक थोरात, जयराम कुंभार, जयप्रकाश साळुंखे, आत्माराम हारुगडे, शीतल बिरणाळे, कुंडलिक थोरात, कारखान्याचे सचिव आप्पासाहेब कोरे, शेती अधिकारी दिलीप पार्लेकर, कामगार अधिकारी वीरेंद्र देशमुख, उदय लाड, विलास जाधव, विश्वजित पाटील उपस्थित होते.
फोटो-१०कुंडल१
फोटो ओळ : कुंडल (ता. पलूस) येथील क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्यात ऊस तोडणी कामगारांसाठी आयोजित रोगनिदान शिबिराचे उद्घाटन किरण लाड व शरद लाड यांच्या हस्ते करण्यात आले.