शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

माधवनगरला पत्रा डेपोवर छापा

By admin | Updated: December 30, 2016 23:45 IST

‘प्राप्तिकर’ची कारवाई : बेदमुथा यांचे निवासस्थान, कार्यालयाचीही झडती

सांगली : माधवनगर (ता. मिरज) येथील प्रसिद्ध न्यू पश्चिम महाराष्ट्र पत्रा डेपोवर कोल्हापूर आणि पुणे विभागाच्या प्राप्तिकर विभागाच्या पथकाने शुक्रवारी दुपारी छापा टाकला. तत्पूर्वी पत्रा डेपोचे मालक सुभाष बेदमुथा यांचे मंगळवार पेठेतील निवासस्थान तसेच मुख्य रस्त्यावरील कार्यालयावरही छापा टाकून झडती घेण्यात आली; पण हाती काहीच लागले नाही. माधवनगर-बुधगाव रस्त्यावर न्यू पश्चिम महाराष्ट्र पत्रा डेपो आहे. दुपारी दोन वाजता प्राप्तिकर विभागाची चार वाहने तेथे दाखल झाली. यामध्ये दोन शासकीय व दोन खासगी वाहने होती. दोन डझनहून अधिक अधिकारी पथकात होते. त्यांनी आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे सांगून तपासणीला सुरुवात केली. कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले. व्यवसायाची सर्व माहिती व कागदपत्रे अपडेट ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच तेथे थांबण्यास सांगून अन्य कर्मचाऱ्यांना बाहेर काढले. डेपोचे मुख्य प्रवेशद्वार बंद केले होते. तेथे डेपोतील दोन रखवालदारांना बसवून, कोणालाही आत न सोडण्याचे आदेश अधिकाऱ्यांनी दिले. तत्पूर्वी पथकाने बेदमुथा यांचे मंगळवार पेठेतील निवासस्थान व मुख्य रस्त्यावरील कार्यालयात जाऊनही झडती घेतली. मात्र तेथे काहीच संशयास्पद सापडले नाही. त्यामुळे पथकाने डेपोवर छापा टाकला. तेथे गेल्या दोन वर्षात डेपोमार्फत झालेल्या सर्व व्यवहारांच्या कागदपत्रांची तपासणी सुरू केली. मालक सुभाष बेदमुथा यांनाही आत येण्यास मनाई केली होती. त्यामुळे ते बाहेर खुर्ची टाकून बसले होते. डेपोच्या आवारात पथकाची वाहने होती. रात्री उशिरापर्यंत ही तपासणी सुरू होती. तपासणीदरम्यान काही महत्त्वाची कागदपत्रे हाती लागली आहेत, त्याबद्दल कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली जात असल्याचे समजते. यासंदर्भात पथकातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र डेपोच्या मुख्य प्रवेशद्वाजवळ असलेल्या रखवालदाराने, आत कोणालाही न सोडण्याचा आदेश आहे, तुम्ही येथून निघून जा, असे उत्तर दिले. (प्रतिनिधी)संशयास्पद काही नाही : सुभाष बेदमुथाडेपोचे मालक सुभाष बेदमुथा म्हणाले की, २०१४ मध्येही प्राप्तिकर विभागाने छापा टाकून तपासणी केली होती. त्यावेळीही काही सापडले नव्हते. आता पुन्हा डेपोसह निवासस्थान व कार्यालयात तपासणी केली जात आहे. आमचा पत्रा विक्रीचा व्यवसाय आहे. हा व्यवसाय करताना संशयास्पद काहीही करीत नाही. त्यामुळे तपासणीत आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य करायला तयार आहोत.