शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

हळद व्यापाऱ्यावर ‘आयकर’चा छापा

By admin | Updated: January 20, 2017 23:27 IST

सांगलीत कारवाई : रात्री उशिरापर्यंत कागदपत्रांची तपासणी

सांगली : येथील वसंतदादा मार्केट यार्डातील एका हळद व बेदाणा व्यापाऱ्यावर शुक्रवारी दुपारी कोल्हापूर विभागाच्या आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. रात्री उशिरापर्यंत संबंधित व्यापाऱ्याच्या दुकानातील कागदपत्रांची तपासणी सुरू होती. या छाप्यामुळे मार्केट यार्डात खळबळ उडाली असून, आणखी काही व्यापारी आयकर विभागाच्या रडारवर असल्याचीही चर्चा आहे. केंद्र शासनाने हजार व पाचशेच्या नोटांवर बंदी घातल्यानंतर सांगलीत आयकर विभागाने टाकलेला हा तिसरा छापा आहे. यापूर्वी जिल्हा मध्यवर्ती बँक, तसेच तासगाव रस्त्यावरील पत्रा डेपोवर छापे टाकण्यात आले होते. शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास कोल्हापूर येथील आयकर विभागाच्या तीन जणांच्या पथकाने मार्केट यार्डातील हळद व्यापाऱ्याच्या दुकानावर छापा टाकला. यार्डातील हमाल भवनसमोर ट्रेडर्स कॉम्प्लेक्स येथे संबंधित व्यापाऱ्याची फर्म आहे. त्यांचा बेदाणा, हळद, गुळाचा व्यापार आहे. छाप्यावेळी दुकानात संबंधित व्यापाऱ्याचे लहान बंधू व दिवाणजी होते. आयकर अधिकाऱ्यांनी दिवाणजीला दुकानाबाहेर काढून प्रवेशद्वार बंद करून घेतले. त्यानंतर दुकानातील काही महत्त्वाची कागदपत्रेही पथकाने ताब्यात घेतल्याचे समजते. फर्मच्या उलाढालीची चौकशीही करण्यात आली आहे. संबंधित व्यापाऱ्याचे कुपवाड एमआयडीसीत स्टोअरेज असून, तेथील उलाढालीचीही तपासणी अधिकाऱ्यांनी केली. तपासणीचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. (प्रतिनिधी)