शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल टॉवरचे काम रोखले

By admin | Updated: July 16, 2014 23:39 IST

एक टॉवर सील : महापालिकेच्या पथकाची कारवाई

सांगली : शहरातील यशवंतनगर येथे विनापरवाना मोबाईल टॉवर उभारण्याचा प्रयत्न महापालिकेच्या पथकाने उधळून लावला. नगररचनाकार ए. पी. जाधव यांच्या पथकाने कारवाईचा बडगा उगारताच या मोबाईल टॉवरचे काम थांबविण्यात आले. दरम्यान, घरपट्टी विभागाने वसंतदादा औद्योगिक वसाहतीतील एक टॉवर थकित घरपट्टीसाठी सील केला. टॉवरचे शुल्क भरण्यासाठी महापालिकेने एका आठवड्याची मुदत दिली असून त्यानंतर सर्वच टॉवरवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. महापालिका क्षेत्रात मोबाईल टॉवरची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महासभा व स्थायी समितीत टॉवरवरील कारवाईवरून बराच गदारोळ झाला आहे. त्यानंतरही म्हणावी तितकी कारवाई अद्याप झालेली नाही. नगररचना विभागाकडून मोबाईल कंपन्यांना अभय दिले जात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर टॉवरवरील कारवाईसाठी नगररचनाकार ए. पी. जाधव यांची खास नियुक्ती करण्यात आली. पण त्यांनाही टॉवरसंदर्भातील फायली देण्याबाबत नगररचना विभागाकडून टाळाटाळ केली जात होती. अशातच यशवंतनगर येथे नितीन बिडीवाले यांच्या इमारतीवर नव्याने टॉवरचे काम सुरू होते. त्यासाठी महापालिकेचा परवाना घेतलेला नव्हता. ही माहिती मिळताच जाधव यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. संबंधित कंपनीकडून टॉवरच्या परवान्याबाबतची कागदपत्रे मागितली, पण कंपनीच्या प्रतिनिधींनी परवाना नसल्याचे स्पष्ट केले. विनापरवाना टॉवरचे काम सुरू असल्याचे उघड होताच, जाधव यांनी तातडीने हे काम थांबविण्याचे आदेश दिले. तसेच टॉवरसाठी लागणारे साहित्यही हलविण्याची सूचना केली. त्यानुसार कंपनीने टॉवरचे काम थांबवून साहित्य इतरत्र हलविले. दरम्यान, घरपट्टी विभागाचे प्रमुख सी. बी. चौधरी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने वसंतदादा औद्योगिक वसाहतीत सुयोग आॅफसेटनजीकचा मोबाईल टॉवर सील केला. या टॉवरची ४४ हजार ६०८ रुपयांची घरपट्टी थकित आहेत. यावेळी पी. बी. कोळी, जी. टी. भिसे, एम. ए. तांबोळी, काका हलवाई, बी. डी. पाटील आदी कर्मचारी उपस्थित होते. महापालिकेने मोबाईल कंपन्यांना टॉवरचे नियमित शुल्क भरण्यासाठी आठवड्याची मुदत दिली आहे. या मुदतीनंतर टॉवर सील करण्याचा इशाराही दिला आहे. (प्रतिनिधी)