शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

दबाव गटाची दिवाळी दणक्यात!

By admin | Updated: November 9, 2015 23:28 IST

महापालिकेत नगरसेवक खुशीत : ठेकेदारांकडून भेटचे वाटप जोरात

सांगली : महापालिकेतील कारभारी नगरसेवकांना शह देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या दबाव गटाची दिवाळी आता दणक्यात साजरी होणार आहे. एका ठेकेदाराकडून दबाव गटातील नगरसेवकांना दिवाळी भेट मिळाल्याची खमंग चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे सोमवारी दिवसभर नगरसेवक चांगलेच खुशीत होते. महापालिकेत काही मोजक्याच नगरसेवकांची कामे होतात, इतर नगरसेवकांना विकास कामातून डावलले जाते, अशी तक्रार करीत ४२ नगरसेवकांचा गट एकत्र आला होता. या गटाला पक्षीय चेहरा नाही. सर्वच पक्षांचे नगरसेवक त्यात सहभागी झाले आहेत. या गटाकडून विकास कामांबाबत महापौर विवेक कांबळे व आयुक्त अजिज कारचे यांच्यावर दबाव आणण्याचा निर्धार करण्यात आला आहे. त्यासाठी सध्या या गटाच्या बैठकांवर बैठका होत आहेत. सध्या पालिकेतील राजकारणाची समीकरणे बदलली आहेत. महापौरांविरोधात कुरघोड्या केल्या जात आहेत. त्यामुळे या गटाचे नेतृत्व महापौरांकडे येईल, असेही बोलले जाते. त्यात दोन महिन्यानंतर होणाऱ्या महापौर निवडीतही हा गट कायम राहिल्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो. गेल्या अकरा महिन्यात महापौरांच्या हाती फारसे काही लागलेले नाही. त्यांना अनेक विषयात माघार घ्यावी लागली आहे. त्यामुळे नव्याने स्थापन झालेला हा दबाव गट त्यांच्यासाठी संजीवनी देणारा ठरणार आहे. अशीच राजकीय गणिते मांडली जात आहेत. त्यात आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर या गटाची चुळबूळ सुरू होती. पण सोमवारी एका योजनेतील ठेकेदाराने दबाव गटाच्या दिवाळीची जबाबदारी उचलली आहे. तशी चर्चाही पालिकेत झाली. त्यामुळे दुपारनंतर पालिकेत दबाव गटातील नगरसेवकांची गर्दी झाली होती. एका पदाधिकाऱ्याच्या अँटी चेंबरमध्ये चर्चेच्या फेऱ्या झडत होत्या. अखेर काही हजार रक्कम दिवाळीसाठी त्यांच्या पदरात पडल्याचे समजते. एका नगरसेवकाला ठेकेदाराने दिवाळी भेटीपोटी धनादेशही दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे दबाव गटाची दिवाळी दणक्यात होणार असल्याने, त्यांचे नगरसेवक चांगलेच खुशीत दिसत होते. (प्रतिनिधी)दहा लाखांची भेट---वित्त आयोगाच्या निधीतून या ठेकेदाराचे बिल काढले जाणार आहे. सध्या हा ठराव रद्द झाला आहे. पण पुढील सभेत तो मंजूर करण्याच्या अटीवर या ठेकेदाराने नगरसेवकांना दहा लाखांची दिवाळी भेट दिल्याची चर्चाही पालिका वर्तुळात सुरू होती.