शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

अध्यक्षांचा निर्णय जयंतरावांकडे

By admin | Updated: May 4, 2016 00:52 IST

विलासराव शिंदे : जिल्हा परिषद अध्यक्षपद तासगावला मिळणारे

सांगली : जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि चार समिती सभापतींना विषय समित्यांचे वाटप केल्यानंतर अध्यक्षांचा राजीनामा घेण्याचे राष्ट्रवादीचे धोरण निश्चित झाले आहे. समित्यांचे वाटप होऊन तीनच दिवस झाले आहे. राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री आमदार जयंत पाटील इच्छुकांशी चर्चा करून निर्णय कळवतील. त्यानंतर लगेच अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर यांचा राजीनामा घेतला जाईल, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांनी ‘लोकमत’कडे मंगळवारी दिले.जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुल्या गटातील महिलांसाठी आरक्षित असल्याने या पदासाठी इच्छुकांची संख्या अधिक आहे. पहिल्या सव्वा वर्षासाठीचे अध्यक्षपद जत तालुक्याला दिल्यानंतर उर्वरित कालावधीसाठी तासगावला संधी देण्याचा निर्णय दिवंगत माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील आणि जयंत पाटील यांनी घेतला होता. आबा हयात नसले तरी तासगावला अध्यक्षपदाची संधी देण्याचा शब्द जयंत पाटील यांनी पाळला आहे. परंतु, तासगाव तालुक्यामध्ये पाचही गटात महिलाच निवडून आल्या आहेत. यापैकी छायाताई खरमाटे यांना सभापतिपदाची संधी मिळाली आहे. शुभांगी पाटील भाजप समर्थक असल्यामुळे त्यांचा पत्ता या स्पर्धेतून कट झाला आहे. सध्या येळावी गटाच्या स्रेहल पाटील, मणेराजुरीच्या योजनाताई शिंदे आणि सावळज गटातील कल्पना सावंत अध्यक्षपदाच्या स्पर्धेत आहेत. शिंदे आणि सावंत यांच्या नावावरून राष्ट्रवादी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये मतभेद चालू आहेत. यावरून राष्ट्रवादी सदस्यांमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे. त्यामुळेच अध्यक्षांचा राजीनामा लांबणीवर पडला आहे, अशी चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, अध्यक्षा होर्तीकर यांचा राजीनामा घेण्याचे निश्चित झाले आहे. जयंत पाटील इच्छुक सदस्यांशी चर्चा करतील. त्यांचा निर्णय माझ्याकडे येईल. त्यानंतरच अध्यक्षांचा राजीनामा घेऊन पक्षाच्या सदस्यांची बैठक बोलावून निवडीबद्दल निर्णय होणार आहे. सर्व सदस्यांची मते जाणूनच अध्यक्षांची निवड होणार आहे. (प्रतिनिधी)