इस्लामपूर येथे भाजपच्या युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सतेज पाटील यांचा आ. आशिष शेलार यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आ. सुरेश खाडे, पृथ्वीराज देशमुख, धैर्यशील मोरे, चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : उरुण इस्लामपूर नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भाेसले-पाटील यांच्या नेतृत्वाखालील भाजप युवा मोर्चाच्या शहर अध्यक्षपदी सतेज जयवंत पाटील यांची निवड झाल्याबद्दल आमदार अशिष शेलार यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
सोमवारी आ. शेलार सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला. यावेळी सतेज पाटील यांचा सत्कार करण्यात आला व पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी मंत्री आ. सुरेश खाडे, तालुका अध्यक्ष धैर्यशील मोरे, तालुका युवा मोर्चा अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.