शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मदनभाऊंच्या वारसांचे म्हणणे सादर

By admin | Updated: December 10, 2015 00:53 IST

वसंतदादा बँक गैरव्यवहार : एका वारसदारास जाहीर समन्स

सांगली : वसंतदादा बँकेतील १७0 कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी माजी अध्यक्ष व संचालक मदन पाटील यांच्या तिन्ही वारसदारांनी बुधवारी आपल्या वकिलांमार्फत म्हणणे सादर केले आहे. सतीश बिरनाळे यांच्या एका वारसदाराचा पत्ता मिळाला नसल्याने त्यांच्यानावे जाहीर समन्स काढण्यात आले आहे. सर्वच माजी संचालक, कर्मचाऱ्यांचे म्हणणे सादर झाले असल्याने पुढील सुनावणीपासून युक्तिवादाला सुरुवात होणार आहे. चौकशी अधिकारी आर. डी. रैनाक यांच्यासमोर बुधवारी सुनावणी झाली. मदन पाटील यांच्या पत्नी जयश्रीताई पाटील, सोनिया होळकर, मोनिका पाटील यांच्यावतीने वकिलांमार्फत म्हणणे सादर करण्यात आले. कर्मचारी पाचोरे यांच्या वारसदारांचेही म्हणणे सादर झाले आहे. वसंतदादा बँकेच्या १७० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ३४ माजी संचालक आणि ७३ कर्मचाऱ्यांना म्हणणे सादर करण्याचे आदेश यापूर्वीच दिले आहेत. एक वारसदार वगळता यातील सर्वांनी म्हणणे सादर केले आहे. त्यामुळे युक्तिवादाला सुरुवात होणार आहे. १३ रोजी कर्मचाऱ्यांच्यावतीने युक्तिवाद सुरु होईल, १८ रोजी मदनभाऊंचे वारसदार युक्तिवाद करणार आहेत. वसंतदादा बँकेचे ११ जानेवारी २००८ रोजी विशेष लेखापरीक्षण झाले होते. या लेखापरीक्षणात १७० कोटी रुपयांच्या अनेक नियमबाह्य कामांबाबत आक्षेप नोंदविण्यात आले होते. याच लेखापरीक्षणाआधारे ४ जुलै २००८ रोजी कलम ८८ नुसार चौकशीचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर तत्कालीन सहकारमंत्र्यांनी त्यास स्थगिती दिली. विद्यमान सहकारमंत्र्यांनी याप्रकरणी तत्कालीन माजी संचालकांना म्हणणे मांडण्याची संधी देऊन, स्थगिती उठविली. त्यानुसार चौकशीस सुरुवात झाली होती. १७० कोटी रुपयांच्या नियमबाह्य कामांमध्ये ३४ माजी संचालक आणि ७३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या सर्वांना नोटिसा बजाविण्यात आल्या होत्या. आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. (प्रतिनिधी)सहकार विभागाचा निकाल नाही...दोघा अधिकाऱ्यांच्या याचिकेवर गेल्या महिन्यात झालेल्या सुनावणीनंतर सहकार विभागाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. लटकलेल्या सहकार विभागाच्या निर्णयामुळे संचालक, अधिकारी आणि बँकेशी संंबंधित अन्य घटकांची संभ्रमावस्था वाढली आहे.