सांगली : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यपातळीवर काय निर्णय होणार, याच्याकडे लक्ष न देता प्रत्येक मतदारसंघातील नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी स्वबळाच्या मानसिकतेने काम करावे, अशी सूचना गृहमंत्री आर. आर. पाटील, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी आज, रविवारी राष्ट्रवादीच्या बैठकीत दिली. सांगलीच्या जिल्हा कार्यालयात झालेल्या बैठकीत आर. आर. पाटील म्हणाले की, गत लोकसभा निवडणुकीत ज्यावेळी राष्ट्रवादीचे कमी खासदार निवडून आले, त्यावेळी विधानसभेला त्याचे गणित मांडून राष्ट्रवादीला काँग्रेसकडून कमी जागा मिळाल्या. त्यावेळी आम्ही ११४ जागा लढविल्या. आता लोकसभेला कॉॅँग्रेसपेक्षा आमच्याकडे दुप्पट जागा आहेत म्हणून आम्ही कॉँग्रेसला त्याप्रमाणात प्रस्ताव दिला नाही. जागांच्या समान वाटणीची मागणी अव्यवहार्य नाही. त्यामुळे राज्यस्तरावर आता कधी निर्णय व्हायचा तो होईल. तोपर्यंत कार्यकर्त्यांनी, इच्छुक नेत्यांनी प्रत्येक मतदारसंघात तयारीला लागावे. स्वबळाचा निर्णय झाला, तर तुम्हाला रान मोकळेच आहे. आघाडी करून लढण्याचा निर्णय झाला तरी काही ठिकाणी आर. आर. पाटील यांनी कार्यकर्त्यांना एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, आमच्या मतदारसंघातील एका गावातून मला दूरध्वनी आला. खते मिळत नसल्याची तक्रार त्याने केली. पाऊस नाही, पेरण्या नाहीत आणि खताची गरज आता कशाला?, असा प्रश्न मला पडला. त्याबाबत त्याला विचारलेसुद्धा. गॅसचे दर वाढले, रेल्वे भाडेवाढ झाली, आता मोदी खतांचेसुद्धा दर वाढविणार असल्याचे कळल्याने, आताच खरेदीसाठी आम्ही प्रयत्न करीत असल्याचे त्याने सांगितले. लगेच मी त्याला म्हणालो, एवढे जर कळत होते, तर कमळाचे बटण झिजेपर्यंत ते दाबले कशाला? यावर उपस्थितांत हशा पिकला.
स्वबळाच्या तयारीला लागा
By admin | Updated: July 7, 2014 00:51 IST