शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

म्हैसाळ योजनेचे आवर्तन फेब्रुवारीत सुरू करण्याची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:38 IST

मिरज : अतिवृष्टीमुळे पाणी उपलब्ध असल्याने यंदा म्हैसाळ योजनेचे आवर्तन फेब्रुवारीअखेर सुरू होण्याची शक्यता आहे. यावर्षी नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात ...

मिरज : अतिवृष्टीमुळे पाणी उपलब्ध असल्याने यंदा म्हैसाळ योजनेचे आवर्तन फेब्रुवारीअखेर सुरू होण्याची शक्यता आहे. यावर्षी नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात आवर्तन सुरू करण्याची गरज भासलेली नाही. पावसाळ्यात आवर्तन सुरू करुन मिरज तासगाव, जत व कवठेमहांकाळ तालुक्यातील ९१ गावांतील १५९ तलाव भरल्याने पिण्याच्या पाण्याचीही टंचाई दूर झाली आहे.

म्हैसाळ योजनेमुळे गेल्या काही वर्षात मिरज पूर्व भागासह जत व कवठेमहांकाळ तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना दिलासा मिळाला आहे. मात्र म्हैसाळचे पोटकालवे अपूर्ण असल्याने पाणी वाटपासाठी वर्षातून दोन वेऴा आवर्तन सुरु करावे लागते. दरवर्षी फेब्रुवारीपासून उन्हाळी व पावसाळ्यानंतर नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये म्हैसाळचे आवर्तन सुरू करण्यात येते. यावर्षी तीनही तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने ओढे, नाले अद्याप वाहत आहेत. पाण्याला मागणी नसल्याने नोव्हेंबर, डिसेंबरचे आवर्तन रद्द करुन फेब्रुवारीत आवर्तन सुरू करण्याची तयारी सुरु आहे. म्हैसाळ योजना सुरू असतानाही तीन तालुक्यांतील काही गावांत पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला तोंड द्यावे लागते. मात्र यावर्षी पुराचे पाणी दुष्काळी भागात पोहोचविण्यासाठी १७ ऑगस्ट ते १७ सप्टेंबरपर्यंत आवर्तन सुरु करुन तीन तालुक्यातील तलाव भरण्यात आले. यासाठी तब्बल पावणेदोन टीएमसी पाण्याचा उपसा करण्यात आला. यामुळे तलाव ओढे, नाले भरले असल्याने जमिनीच्या पाणी पातळीत वाढ होऊन विहिरी, कूपनलिकांना पाणी आहे. म्हैसाळ योजनेतून अनेक गावांतील तलाव भरल्याने, नेहमी उन्हाळ्यात पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणाऱ्या टंचाईग्रस्त गावांत यावर्षी दिलासा मिळाला आहे. सध्या म्हैसाळ योजना बंद असल्याने कालवे व वितरिकांच्या अस्तरीकरणाची कामे सुरू आहेत.

चाैकट

तलावातील पाणीसाठा

मिरज : ३४ गावे, ६८ तलाव, २६५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा

तासगाव : ८ गावे, ८ तलाव, २१७ दशलक्ष घनफूट पाणीसाठा

कवठेमहांकाळ : २६ गावे, ४१ तलाव, ३६६ दशलक्ष घनफूट पाणीसाठा

जत : २३ गावे, ४१ तलाव, ५१८ दशलक्ष घनफूट पाणीसाठा

फाेटाे : १३ मिरज २..३