शहरं
Join us  
Trending Stories
1
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
2
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
3
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
4
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
5
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
6
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
7
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
8
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
9
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
10
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
11
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
12
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
13
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
14
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
15
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू
16
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
17
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
18
एका कुशीवरुन दुसऱ्या कुशीवर... पण काही केल्या झोपच येईना; 'या' ६ टिप्स गाढ झोपेमागचं रहस्य
19
'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत
20
चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना

सांगली, मिरजेमध्ये ‘प्रीपेड रिक्षा’ सेवा!

By admin | Updated: August 1, 2015 00:33 IST

आरटीओंचा प्रस्ताव : प्रवाशांची सोय

सचिन लाड - सांगली -रिक्षाचालक जादा भाडे घेत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी वाढल्याने, सांगली, मिरजेत ‘प्रीपेड रिक्षा’ ही नवीन योजना सुरू करण्याचा प्रस्ताव उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) दशरथ वाघुले यांनी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांना सादर केला आहे. या प्रश्नावर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आहे. या बैठकीत नोंदणीकृत रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केले जाणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर सांगलीतील मुख्य बसस्थानक व मिरज रेल्वे स्टेशनवरून ही सेवा सुरू केली जाणार आहे. ग्राहक पंचायतीची बैठक झाली. यावेळी सांगली, मिरजेत एकही रिक्षाचालक मीटरप्रमाणेभाड्याची आकारणी करीत नाही. रिक्षा टेरिफ कार्ड (भाडे दरपत्रक) नसते. चालकांच्या खिशाला बॅच-बिल्ला नसतो. भाडे अंदाजे सांगितले जाते. रिक्षाचालक व प्रवाशांमध्ये वाद होत आहेत, असे मुद्दे सदस्यांनी मांडले. यावेळी ‘प्रीपेड रिक्षा सेवा’ सुरू करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यास सर्व सदस्यांनी होकार दिला.अशी आहे ‘प्रीपेड सेवा’...‘प्रीपेड सेवा’ योजनेचा ग्राहक पंचायत, सेवाभावी संस्था किंवा प्रवासी संघटनेला ना नफा ना तोटा या तत्त्वावर ठेका दिला जाणार आहे. ठेका घेणाऱ्या संघटनेचे ‘प्रीपेड रिक्षा सेवा’ या नावाने कार्यालय असेल. तेथे दोन कर्मचारी नियुक्तीस असतील. तेथे २४ तास वाहतूक पोलीस असेल. शहर व परिसरातील हद्दीची ठिकाणे, अंतर व त्यासाठी होणारे रिक्षाचे भाडे, याची सर्व माहिती कार्यालयात असेल. प्रवाशांनी कार्यालयात जाऊन कोठे जायचे आहे, ते ठिकाण सांगायचे, त्यानंतर तेथून प्रवाशांना भाड्याचे पैसे भरून घेऊन पावती दिली जाणार आहे. या पावतीवर थांब्यापासून जेथे जायचे आहे, त्या ठिकाणाचा उल्लेख, अंतर, रिक्षा क्रमांक व भाडे किती घेतले, याची नोंद असणार आहे. प्रवाशांच्यादृष्टीने योजना चांगली आहे. सांगली, मिरजेत येणारा ९० टक्के प्रवासी ग्रामीण भागातील असतात. त्यांचा या योजनेला प्रतिसाद मिळणार नाही. मोठ्या शहरात प्रवासी सुशिक्षित असतो, मात्र आपल्याकडे सरसकट अशी स्थिती नाही. त्यामुळे ही योजना यशस्वी राबेल, असे वाटत नाही. - महादेव पवार, जिल्हाध्यक्ष, सांगली जिल्हा रिक्षा चालक-मालक संघटना.मुंबई-पुण्यानंतर सांगलीत!मुंबई, पुणे, नाशिक शहरात ‘प्रीपेड रिक्षा’ सेवा सुरू आहे. त्याच धर्तीवर सांगली, मिरजेत सुरू केली जात आहे. यापूर्वी सांगली, मिरजेत शेअर-ए रिक्षा सुरू केली होती. प्रवाशांच्यादृष्टीने ती चांगली ठरली होती; पण रिक्षाचालकांमध्ये प्रवासी घेण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून शेअर-ए रिक्षा बंद पडली.‘प्रीपेड रिक्षा’ सेवा योजना चालविण्याचा ठेका घेणाऱ्या संघटनेला प्रत्येक भाड्यामागे पाच ते दहा रुपये कमिशन दिले जाणार आहे. तेथे दोन कर्मचारी असतील. त्यांचा पगार, कार्यालयाचे भाडे, विजेचे बिल याचा खर्च कमिशनमधून निघेल. यासाठी प्रवाशांकडून जादा पाच रुपये घेतले जाणार आहेत. रिक्षाचालकाच्या भाड्याला कात्री लावली जाणार नाही. प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे.योजनेचे प्रवाशांना होणारे फायदे‘प्रीपेड सेवे’मुळे रिक्षाचालक व प्रवाशांमध्ये भाडे आकारणीवरून कोणताही वाद होणार नाही. प्रवाशांना सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. चालकाकडून कोणतेही गैरवर्तन होणार नाही. जरी झालेच तर, त्याच्याबद्दल तक्रार करता येणार आहे. कारण भाडे आकारणीच्या पावतीवर रिक्षाचा क्रमांक असणार आहे. चालकाला कोणत्याही प्रकारचे भाडे टाळता येणार नाही. थांब्यात नंबरात उभे राहून व्यवसाय करावा लागणार आहे. प्रवाशांचा रिक्षाने प्रवास करण्याचा कल वाढेल. अवैध प्रवासी वाहतुकीला आळा बसेल. सुट्टे पैसे असणे-नसणे यातून प्रवाशांबरोबर होणारा वाद थांबेल. मीटर सुरू आहे का नाही, याची प्रवाशांना खात्री करण्याची गरज नाही.योजनेचे प्रवाशांना होणारे फायदे‘प्रीपेड सेवे’मुळे रिक्षाचालक व प्रवाशांमध्ये भाडे आकारणीवरून कोणताही वाद होणार नाही. प्रवाशांना सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. चालकाकडून कोणतेही गैरवर्तन होणार नाही. जरी झालेच तर, त्याच्याबद्दल तक्रार करता येणार आहे. कारण भाडे आकारणीच्या पावतीवर रिक्षाचा क्रमांक असणार आहे. चालकाला कोणत्याही प्रकारचे भाडे टाळता येणार नाही. थांब्यात नंबरात उभे राहून व्यवसाय करावा लागणार आहे. प्रवाशांचा रिक्षाने प्रवास करण्याचा कल वाढेल. अवैध प्रवासी वाहतुकीला आळा बसेल. सुट्टे पैसे असणे-नसणे यातून प्रवाशांबरोबर होणारा वाद थांबेल. मीटर सुरू आहे का नाही, याची प्रवाशांना खात्री करण्याची गरज नाही.