शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

निसर्गानं मारलं, पाटबंधारेनं फसवलं!

By admin | Updated: July 10, 2014 00:40 IST

शाळगाव परिसराची अवस्था : खरीप हंगाम धोक्यात

शाळगाव : निसर्गानं मारलं... पाटबंधाऱ्यानं फसवलं आणि महावितरणने पळवलं... अशा विचित्र अवस्थेत सध्या शाळगाव (ता. कडेगाव) परिसरातील शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे.शाळगाव परिसर कडेगाव तालुक्यातील उत्तरेकडील शेवटचे टोक. या परिसरात शाळगाव, रायगाव, बोंबाळेवाडी, विहापूर, शिवाजीनगर, येडे, उपाळे, हिंगणगाव बुद्रुक अशी गावे येतात. खरीप व रब्बी पिकांसाठी पूर्वी प्रसिध्द, परंतु शाळगाव, करांडेवाडी, शिवाजीनगर आणि हिंगणगाव बुद्रुक येथे तलाव झाल्याने नंतर बागायत पिकांनी जोर धरला. पूर्वी या भागात पानमळे होते. आता कारखाने झाल्याने ऊसपीक घेतले जात आहे.आज मात्र या भागाची अवस्था विचित्र झाली आहे. हिंगणगाव व शिवाजीनगर तलावात टेंभूचे पाणी सोडले आहे. त्यामुळे या दोन गावातील परिस्थिती बऱ्यापैकी आहे. परंतु शाळगाव, करांडेवाडी या दोन तलावात पाणी नाही. त्यामुळे या भागातील परिस्थिती अवघड बनली आहे. गेले अनेक दिवस पावसाची अवकृपा आहे. साहजिकच खरीप हंगाम धोक्यात आला आहे. तलाव आहे, परंतु पाटबंधारे खात्याच्या मनमानी कारभारामुळे या तलावात टेंभूचे पाणी कायमस्वरूपी येऊ शकत नाही. अशा परिस्थितीवर मात करून शेतकऱ्यांनी बागायत पिके घेतली आहेत. ऊसपीक मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु महावितरणची वीज कधी येते कधी जाते याचा पत्ताच नसतो. बटण दाबून दाऱ्यावर जाईपर्यंत वीज गुल होते. त्यामुळे शेतकऱ्यांना विजेसाठी पळापळ करावी लागते. त्यामुळे शेकडो एकर ऊसपीक धोक्यात आले आहे. साहजिकच निसर्गानं मारलं, पाटबंधाऱ्यानं फसवलं आणि महावितरणनं पळवलं, अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग हैराण झाला आहे. (वार्ताहर)