शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

प्रहार शेतकरी संघटना राष्ट्रवादीच्या तंबूत;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : कडकनाथ प्रकरणाविरोधात लढणारे प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिग्विजय पाटील राष्ट्रवादीच्या तंबूत जाऊन पालिका निवडणुकीत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : कडकनाथ प्रकरणाविरोधात लढणारे प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिग्विजय पाटील राष्ट्रवादीच्या तंबूत जाऊन पालिका निवडणुकीत उतरण्याच्या तयारीला लागले आहेत. राष्ट्रवादीने प्रहार संघटनेला काही जागा दिल्या नाहीत, तर दोन ते तीन प्रभाग लढविण्याची तयारी त्यांनी दर्शविली आहे.

राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या प्रहार शेतकरी संघटनेत २०१५ पासून दिग्विजय पाटील कार्यरत आहेत. इस्लापूरसह ग्रामीण भागातही त्यांच्या संघटनेच्या शाखा आहेत. पाटील यांनी संघटनेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. विशेषत: मोफत रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून दिली आहे. कोरोना महामारीच्या काळात वाळवा, शिराळा तालुक्यातील जवळजवळ २ हजार रुग्णांना कोविड सेंटरवर विनामोबदला नेले आहे. तसेच कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे स्मशानभूमीपर्यंत वाहून नेण्याची सेवाही त्यांच्या संघटनेने केली आहे. हे त्यांचे कार्य कोरोना योध्द्यांच्या पलीकडे आहे. इस्लामपूर शहरातील सुविधांचा अभाव, विकासाचे वाजलेले तीनतेरा, निकृष्ट कामाचा दर्जा आदी परिस्थिती पाहून आगामी पालिकेच्या निवडणुकीत उतरण्याचे प्रहार शेतकरी संघटनेने निश्चित केले आहे. याला संघटनेचे संस्थापक बच्चू कडू यांनीही हिरवा कंदील दाखविला आहे.

राज्यात महाआघाडी सरकार असल्याने या सरकारमध्ये प्रहार संघटना घटकपक्ष म्हणून कार्यरत आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीच्या कोट्यातून दिग्विजय पाटील प्रभाग ११ मध्ये लढण्याची तयारी करत आहेत. परंतु राष्ट्रवादी या संघटनेला कितपत न्याय देईल, हे पाहावे लागेल.

कोट

इतर संघटनांपेक्षा प्रहार संघटनेकडे कार्यकर्त्यांची फळी मोठी आहे. या संघटनेत युवाशक्ती मोठी आहे. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत प्रहार शेतकरी संघटना राष्ट्रवादीकडे काही जागा मागणार आहे. राष्ट्रवादीने याचा विचार नाही केला, तर ही संघटना दोन ते तीन प्रभाग स्वबळावर लढेल.

- दिग्विजय पाटील, जिल्हाध्यक्ष, प्रहार शेतकरी संघटना

फोटो -०४१२२०२०-आयएसएलएम- दिग्विजय पाटील