प्रचारक बी. जी. वावरे, सरपंच राजेंद्र शिरोटे, राजाराम माळी, रामचंद्र थोरात, अशोक घाईल, दीपक घोरपडे, सदाशिव माळी, अशोक माळी, जयवंत माळी, केशव थोरात यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. मुख्याध्यापक रघुनाथ थोरात, मुख्याध्यापक सुमती खाडे, सुनील हुळे, पोलीसपाटील मल्हारी पाटील यांचे सत्कार करण्यात आले. आकाश तारा मित्रमंडळाच्या पुढाकाराने रॅली काढण्यात आली. घोषणा देत कोरोना प्रतिबंधक सूचनांचे पत्रके वाटप करण्यात आली. डी. एम. शिरोटे, हर्षल मळणगावे, अमोल मळणगावे, विनायक माळणगावे, शहाजहान बारगीर, दिनेश बेडगे, शुभम देशमाने, ऋषिकेश शेटे आदी सहभागी होते. साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करताना अवास्तव खर्चाला फाटा देत सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत.
गुणधर शिरोटे, सदाशिव माळी बाबासाहेब पाटणे, सुनील घाईल, रमेश देशमाने, शरद शिरोटे, संदेश बेडगे, पवन बेडगे उपस्थित होते. मुकुंद मळणगावे यांनी स्वागत, अनिल देशमाने यांनी सूत्रसंचालन केले. प्रदीप पोतदार यांनी आभार मानले.