शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

समाजाला जोडण्याची ताकद धर्मात: चारूकीर्ती स्वामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:06 IST

सांगली : समाजात मोठ्या वेगाने परिवर्तन होत आहे. या परिस्थितीत धर्म कायम राहणे व त्याची वृध्दी होणे आवश्यक आहे. ...

सांगली : समाजात मोठ्या वेगाने परिवर्तन होत आहे. या परिस्थितीत धर्म कायम राहणे व त्याची वृध्दी होणे आवश्यक आहे. जनतेच्या हृदयातील धर्माचे संवर्धन करणे गरजेचे असून, मंदिरापेक्षाही लोकांच्या हृदयात त्याचे स्थान आहे. समाजात होत असलेली क्रांती पाहता, एकतेसाठी धर्म काम करतो. त्यामुळे समाजाला जोडण्याची ताकद धर्मात आहे, असे प्रतिपादन श्रवणबेळगोळ येथील जैन मठाचे प्रमुख स्वस्तिश्री चारुकीर्ती महास्वामी यांनी रविवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना केले.विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने सांगलीत आलेल्या महास्वामींनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत, विविध विषयांवर आपली मते नोंदवत, समाजाच्या एकतेसाठी व अखंडतेसाठी धर्माचे अधिष्ठान महत्त्वाचे असल्याचे आवर्जून सांगितले.ते म्हणाले, शैक्षणिकदृष्ट्या नवीन पिढी प्रगल्भ होत आहे. तरूणांमध्ये आस्तिकता वाढत आहे. धर्ममार्गात तेही येऊ शकतात. त्यामुळे या पिढीत धर्माप्रति रुची निर्माण करण्याची गरज आहे. परिवर्तनशील बनलेल्या समाजात निरंतर जागृतीची आवश्यकता आहे. संस्कृतीला सुरक्षित राखण्याचे काम सर्वच घटकांनी केले पाहिजे. समाजाला जोडण्याच्या भूमिकेत धर्म असतो, तर तोडणारा अधर्म असतो. नव्या समाजात शांतीची प्रत्येकाला गरज असल्याने, दोष सोडून सहनशीलतेमुळे परिवारात आनंद निर्माण होऊ शकतो. क्रियेला प्रतिक्रिया दिल्यानेच वादविवाद निर्माण होतात.प्राकृत भाषेला सर्वजण विसरले होते. मात्र, याच भाषेत जैन समाजाचे सार असल्याने पुन्हा स्थापित करण्यात येत आहे. या विषयावर पन्नासहून अधिक ग्रंथ प्रकाशित केले असून, हा संकल्प पूर्ण करण्यासाठी वाहन वापरणे सोडले होते. भगवान महावीरांचे विचार यातून दिले आहेत. श्रवणबेळगोळ येथील हॉस्पिटल नसून त्याला आम्ही मंदिर म्हणतो. गेल्या २५ वर्षांपासून परिसरातील बेरोजगारी मिटविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. प्राकृत विश्वविद्यालयाची स्थापना करून प्राकृत, संस्कृत व पाली भाषा जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे.यावेळी माजी महापौर सुरेश पाटील, माजी न्यायमूर्ती भालचंद्र वग्याणी, सनतकुमार आरवाडे आदी उपस्थित होते.