शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

कवठेमहांकाळमध्ये भ्रष्टाचार

By admin | Updated: April 12, 2017 23:40 IST

अजितराव घोरपडे : पाणलोट विकास कामांच्या चौकशीची मागणी

कवठेमहांकाळ : सरकारच्या कृषी विभागामार्फत राबवलेल्या पाणलोट क्षेत्र विकास कामात व इतर योजनेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा संशय असून, याला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी, तसेच तालुक्यात पाणलोट क्षेत्र विकासअंतर्गत केलेल्या कामांची माहिती द्यावी, अशी मागणी अजितराव घोरपडे यांच्यासह कुंडलापूर येथील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाच्यावतीने कृषी अधिकारी अमृतसागर यांच्याकडे केली.कवठेमहांकाळ तालुका कृषी कार्यालयातील एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमातील कामात लाखोंचा भ्रष्टाचार होत असल्याची ओरड कुंडलापूर येथील नागरिकांनी केली आहे. यासाठी अजितराव घोरपडे यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह तालुका कृषी अधिकारी अमृतसागर यांची भेट घेतली. यावेळी नागरिकांनी अजितराव घोरपडे यांच्यासमोर अधिकाऱ्यांवर एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला.शासनाने मोठा गाजावाजा करत एकात्मिक पाणलोट विकास अभियान हाती घेतले. या कार्यक्रमाचा शेतकऱ्यांना फायदा होऊन आर्थिक स्तर उंचावण्याचा शासनाचा जरी प्रयत्न असला तरी शासनाने नियुक्त केलेलेच कर्मचारी पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमात मोठ्य प्रमाणात भ्रष्टाचार करून आपले उखळ पांढरे करून घेत असल्याचा आरोप कुंडलापूर येथील शेतकऱ्यांनी केला आहे. येथील तालुका कृषी अधिकारी अमृतसागर केवळ नामधारी असून, कृषी पर्यवेक्षक अनिल पाटील हेच कामकाज चालवितात की काय?, असा सवाल शेतकरी विचारत असून, त्यांच्या कामामुळे कृषी अधिकारी नामोहरम असल्याचे दिसून येत आहे. या भ्रष्टाचाराची शहानिशा करण्यासाठी कार्यालयाशी संपर्क साधला असता, थातूर-मातूर उत्तरे देण्यात आली असल्याने त्या गावात किमान ५० लाख रुपयांचा अपहार झाल्याची चर्चा आहे. या अपहारप्रकरणी लवकरच एक शिष्टमंडळ वरिष्ठांना भेटून कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे महादेव पाटील यांनी सांगितले.तालुक्यात शेततळी, नालाबंडिंग, सिमेंट बंधारे आदी कामे झाली आहेत. कुंडलापूर येथे पंधरा हजार रुपयांची माहिती पुस्तके वितरित केली आहेत. मात्र प्रत्यक्षात गावात एकाही लाभार्थ्याला माहितीपुस्तके मिळाली नाहीत. तसेच अव्वाच्या सव्वा दराने सोलर खरेदी केले आहेत. जुन्याच बंधाऱ्यावर नवीन बंधारा बांधून बिले काढली आहेत. तसेच शेतीसाठी दिलेल्या अनुदानाचा गैरव्यवहार झाला आहे, असा आरोप पोपट गिड्डे यांनी अमृतसागर यांच्याकडे केला. यावेळी तानाजी यमगर, सुनील पाटील, दादासाहेब कोळी, दिलीप झुरे, वैभव नरुटे उपस्थित होते. (वार्ताहर)