शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सकारात्मक दृष्टिकोन आनंदी जीवनाची गुरुकिल्ली : असिरा चिरमुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 23:24 IST

वाई : ‘धकाधकीच्या जीवनात मनुष्य सुख शोधण्यासाठी धडपडत असतो, प्रचंड कष्ट करण्याची तयारी ठेवतो; परंतु त्यासाठी तो नेहमी दुसऱ्याशी स्पर्धा करताना दिसतो, दुसऱ्याच्या यशामध्ये स्वत:चे सुख शोधल्यास यश तुम्हाला

ठळक मुद्देवाई येथे लोकमान्य टिळक स्मारक संस्थेच्या आयोजित वसंत व्याख्यानमालेत प्रतिपादन

वाई : ‘धकाधकीच्या जीवनात मनुष्य सुख शोधण्यासाठी धडपडत असतो, प्रचंड कष्ट करण्याची तयारी ठेवतो; परंतु त्यासाठी तो नेहमी दुसऱ्याशी स्पर्धा करताना दिसतो, दुसऱ्याच्या यशामध्ये स्वत:चे सुख शोधल्यास यश तुम्हाला शोधत येते, माणसाने जर जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवल्यास जीवन आंनदी व सुखी होते. सकारात्मक दृष्टिकोन हा आनंदी जीवनाची गुरुकिल्ली आहे,’ असे प्रतिपादन क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ व मानसोपचारतज्ज्ञ असिरा चिरमुले यांनी केले.

लोकमान्य टिळक स्मारक संस्थेने आयोजित केलेल्या वसंत व्याख्यानमालेत ‘आनंदी जीवनाची गुरुकिल्ली’ या विषयावर प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी विश्वकोशाचे अभ्यागत संपादक डॉ. सुरेश देशपांडे हे होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. शरद अभ्यंगकर, उपाध्यक्ष प्रा. सदाशिव फडणीस, कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत रांजणे, कार्यवाहक वसंतराव बोपर्डीकर, सहकार्यवाहक अनिल जोशी, विश्वस्त सुनील शिंदे, अ‍ॅड. शांतिलाल ओसवाल, अजित खामकर, मधनकुमार साळवेकर, विशाल कानडे यांची उपस्थिती होती.चिरमुले म्हणाल्या, सध्याचा मानव चंद्रावर जाऊन पोहोचला तरीही दुसºयाची निंदा-नालस्ती करण्याचे थांबलेला नाही. दुसºयाला पाण्यात पाहण्याने शिखराला गवसणी घालणारा परमोच्च आंनद मिळतो. दुसºयाला दु:खाच्या खाईत लोटून मिळविलेला आनंद हा जास्त काळ टिकणारा नसतो.

असिरा चिरमुले यांनी अनेक गोष्टींवर प्रकाश टाकत मनुष्य जीवनात आनंद शोधण्यासाठी किती धडपडत असतो, हे अनेक उदाहरणे देऊन संवाद साधला. कार्यक्रमाचे लक्ष्मीकांत रांजणे यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा प्रा.आनंद घोरपडे यांनी परिचय करून दिला. डॉ. रुपाली अभ्यंगकर यांनी आभार मानले.तरच यश मिळते...दुसºयाचा दुस्वा:स करणे सोडून द्या, जीवनात मिळालेल्या संधीच सोनं करा, समाजकार्यात स्वत:ला नि:स्वार्थीपणे झोकून दिल्यास खरा आनंद प्राप्त होतो. दुसºयाला दु:खाच्या खाईत लोटून मिळविलेला आनंद हा जास्त काळ टिकणारा नसतो. तुमचे कर्मच दु:खाला निमंत्रण देत असते. मिळणाºया फळाची आशा न बाळगता कार्य केल्यास यश निश्चितच मिळते व तो आनंद पराकोटीचा असतो.