शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

जतमध्ये छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जत : जत-सांगली मार्गावरील नगरपरिषदेच्या जलशुध्दीकरण केंद्राजवळ असलेल्या जत नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाची दुरवस्था झाली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जत : जत-सांगली मार्गावरील नगरपरिषदेच्या जलशुध्दीकरण केंद्राजवळ असलेल्या जत नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाची दुरवस्था झाली आहे. विद्युत यंत्रणा, झाडांची कत्तल, लहान मुलांची खेळणी, तुटलेले बाके, उद्यानाच्या फलकाची दुर्दशा झाली आहे. याबाबत नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

जत नगरपरिषदेने जत ते सांगली मार्गावरील जागेवर लाखो रुपये खर्च करून चांगल्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाची उभारणी केली होती.

उद्यानात नगरपरिषदेने विविध प्रकारची शोभिवंत अशी झाडे लावली होती. या झाडांना संरक्षण म्हणून उद्यानासभोवती लोखंडी खांब उभे करून तारेचे कंपाउंडही घातले होते. जत येथील काही दानशूर व्यक्तींनी उद्यानात अबालवृद्धांना बसण्यासाठी सिमेंट बाकडी भेट दिली होती. लहान मुलांसाठी खेळणीही उपलब्ध करून दिली होती.

सध्या उद्यानाकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष झाल्याने उद्यानाची दुर्दशा झाली आहे. उद्यानासभोवती असलेले तारेचे कंपाउंड नाहीसे होत चालले आहे. उद्यानातील लहान मुलांची खेळणी मोडकळीस आली आहेत. काही ठिकाणची खेळणी गंजून चालली आहेत. दानशूर व्यक्तीनी जत नगरपरिषदेस भेट म्हणून दिलेली सिमेंटची बाके फुटली आहेत.

उद्यानातील विद्युत यंत्रणा बंद आहे. उद्यानातील रात्रीच्या वेळी लाइटची व्यवस्था नसल्यामुळे अबालवृद्धांची गैरसोय होत आहे. कंपाउंड नसल्याने उद्यानातील झाडांची कत्तल झाली आहे.

उद्यानाच्या सकृतदर्शनी भागात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाची फलकाचीही दुर्दशा झाली आहे. नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे उद्यानाची बकाल अवस्था झाली आहे.

नगरपरिषद नगरोत्थान योजनेतून शहरातील विद्यानगर, मोरे काॅलनी आदी ठिकाणी नवीन उद्यानाची उभारणी करण्यासाठी लाखो रुपये खर्च करत असताना दुसरीकडे मात्र पूर्वीच्या उभारण्यात आलेल्या उद्यानाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहे.

नगरपरिषदेने छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाची त्वरित दुरुस्ती करावी. उद्यानाला पूर्वीचे स्वरूप प्राप्त करून द्यावे, अशी मागणी अबालवृद्धांकडून करण्यात येत आहे.