शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

कवठेमहांकाळमध्ये तलाव आटले

By admin | Updated: November 23, 2015 00:31 IST

पाण्याचा प्रश्न गंभीर : पंधरा दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक

अर्जुन कर्पे -- कवठेमहांकाळ तालुक्यातील ११ तलावांपैकी ७ तलावांतील पाणीसाठा येत्या आठवडाभरात आटण्याच्या मार्गावर असून, उर्वरित ४ तलावांतील पाणीसाठा १५ दिवस पुरेल एवढाच शिल्लक राहिलेला आहे. तसेच ९0 टक्के रब्बीची पेरणी झालेले क्षेत्र पाण्याअभावी व पावसाअभावी वाया जाणार आहे. तालुक्यात शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, येत्या १५ दिवसांनंतर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही ऐरणीवर येणार आहे. या सर्व प्रश्नांकडे प्रशासन असो की, राजकीय प्रतिनिधी असोत, डोळेझाक करीत असल्याचे चित्र आहे. खरीप हंगामानंतर किमान नोव्हेंबरपर्यंत तरी पाऊस येईल, असा शेतकऱ्यांचा अंदाज होता आणि रब्बी हंगाम सुरळीत पार पडेल असे वाटत होते. तालुक्यातील शेतकऱ्यांनी तेवीस हजार नऊशे सहासष्ट हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी एकवीस हजार पाचशे सत्त्याहत्तर हेक्टरवर रब्बी ज्वारी, गहू, मका, हरभरा, सूर्यफूल, करडई आदी गळीत धान्याची एकूण ९0 टक्के क्षेत्रावर पेरणी केली. या रब्बी हंगामात पाऊस येईल अथवा ‘म्हैसाळ’चे पाणी मिळेल, या आशेवर शेतकरी होता. परंतु शेतकऱ्यांची घोर निराशा झाली. ना पाऊस आला, ना ‘म्हैसाळ’चे पाणी. त्यामुळे रब्बी हंगाम पूर्णपणे वाया जाण्याच्या अवस्थेत आला. तालुक्यात ११ तलावांतील जो उपलब्ध पाणीसाठा आहे, तोही १५ डिसेंबरपर्यंतच पुरणार आहे. यापैकी ७ तलावांतील पाणीसाठा पूर्णपणे गाळापर्यंत पोहोचला आहे; तर उर्वरित ४ तलावांतील पाणीसाठा फक्त १५ डिसेंबरपर्यंतच पुरेल इतका आहे. त्यामुळे हे उपलब्ध पाणी फक्त पिण्यासाठी उपयोगी पडणार आहे. याचा शेतीला काहीही उपयोग होणार नाही. तसेच म्हैसाळ योजनेचे १८ कोटी रुपये वीज बिल थकित असल्याने म्हैसाळ योजना ही सध्या बंद आहे. त्यामुळे वीज बिल भरल्याखेरीज म्हैसाळचे पाणी शेतीला मिळणार नाही. त्यामुळे रब्बी हंगामही तरणार नाही. एकूणच पाण्याअभावी शेतीचे व शेतकऱ्यांचे मोठे हाल सुरू झाले आहेत.तलावक्षमता उपलब्ध पाणी कुची७९.0५८.६रायवाडी७६.६० ३२.१४ लांडगेवाडी ३७.0३१.0५लंगरपेठ ७८.३९११.८८नांगोळे४५.८५१७.८९बोरगाव५७.७११.७५दुधेभावी १४०.६३१५.0५ घोरपडी ५३.२७ 0.0४बंडगरवाडी ७२.६१३९.६८बसाप्पाचीवाडी २७४.५७ १८१.१४पाणी नाही : उत्पादन खर्च निघणेही कठीणयावर्षी कवठेमहांकाळ तालुक्यात पावसाने हुलकावणी दिली. त्यामुळे खरीप हंगामही कसाबसा शेतकऱ्यांनी घेतला. खरीप हंगामात ‘म्हैसाळ’चे पाणी थोड्या प्रमाणात आले. परंतु ते बेभरवशाचे ठरले. नियमितपणे खरीप हंगामात ‘म्हैसाळ’चे पाणी मिळू शकले नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी पूर्णपणे हतबल झाला. साधा उत्पादन खर्चही खरीप हंगामात त्याला मिळू शकला नाही.