शहरं
Join us  
Trending Stories
1
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
2
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
3
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
4
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले
5
विश्वास बसला नसता...! युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे रशियाचे सुखोई फायटरजेट पाडले; अमेरिकेसह सर्व देशांच्या सैन्यांना धक्का
6
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा आणखी एक कट उघड; गुप्तचर विभागाची माहिती, अलर्ट जारी
7
"लग्नानंतर ४ वर्षांनी घटस्फोट झाला आणि...", Divorce बद्दल पहिल्यांदाच बोलला स्वप्नील जोशी
8
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
9
Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्...
10
धक्कादायक! पुण्यात नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाविरोधात गुन्हा दाखल
11
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
निवेदिता सराफ यांच्याकडून घडलेली 'ती' चूक, अशोक सराफ यांनी पत्नीला चांगलंच सुनावलं
13
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
14
घरातल्या कमोडमध्ये झाला मोठा धमाका, वेस्टर्न टॉयलेटचा स्फोट होऊन तरुण गंभीर जखमी!
15
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
16
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
17
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
18
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
19
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
20
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ

डाळिंब बागायतदारांवर ‘संक्रांत’

By admin | Updated: December 8, 2015 00:44 IST

बाजारात कवडीमोल किंमत : चेन्नईतील पावसाचा मोठा फटका

गजानन पाटील -- संख--तमिळनाडू राज्यात झालेला मुसळधार अवकाळी पाऊस, उत्पादनातील वाढ यामुळे बाजारपेठेमध्ये डाळिंबाच्या दरात कमालीची घसरण झाली आहे. गंभीर दुष्काळी परिस्थिती, बिब्ब्या रोगाचा प्रादुर्भाव, तीव्र पाणीटंचाई या प्रतिकूल परिस्थितीतून वाचलेल्या बागांतून डाळिंब विक्रीची सुरुवात झालेली असताना, दर कमी झालेला आहे. बागांसाठी महागडी औषधे, रासायनिक खते, तसेच शेणखताचा लागवडीसाठी उपयोग करून, मशागतीचा भरमसाट खर्च करून आणि अनेक अडचणींवर मात करून पिकविलेली डाळिंबे कवडीमोल दराने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.तालुक्यामध्ये डाळिंबाचे क्षेत्र ११ हजार ३४४.५८ हेक्टर आहे. कमी पाण्यात, अनुकूल हवामान, खडकाळ जमिनीवर येणारे फळबागेचे हे पीक आहे. शेतकऱ्यांनी उदरनिर्वाहापुरती खरीप व रब्बी हंगामातील पिके घेऊन विहीर व कूपनलिकेमध्ये असलेल्या पाणीसाठ्यावर द्राक्षे, डाळिंब फळबागा लावल्या आहेत. द्राक्षबागेपेक्षा कमी खर्च येत असल्यामुळे शेतकरी डाळिंबाकडे वळला आहे. शंभर टक्के फळबाग अनुदान योजनेतून, ठिंबक सिंचन, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून शेतकऱ्यांनी उजाड माळरानावर बागा फुलविल्या आहेत. गणेश, केशर, आरक्ता, भगवा जातीच्या बागा आहेत. दरीबडची, काशिलिंगवाडी, सोन्याळ, जाडरबोबलाद, उटगी, आसंगी, उमदी, जालिहाळ खुर्द, दरीकोणूर, मुचंडी येथील शेतकऱ्यांनी चांगल्या दर्जाचे डाळिंब उत्पादन केले आहे. इतर फळबागांपेक्षा कमी मशागतीच्या खर्चामध्ये, कमी कष्टामध्ये ते उत्पादन घेत असल्यामुळे या शेतकऱ्यांनी बागा फुलविल्या आहेत. आर्थिक फायदाही चांगला झाला आहे. जून, जुलैमध्ये धरलेल्या बागांची डाळिंबे विक्रीयोग्य होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र बाजारपेठेत दर कमी झाले आहेत. सप्टेंबर आणि आॅक्टोबरमध्ये भगवा केशर जातीच्या डाळिंबांचा सरासरी ९० ते १२० रुपये किलो दर होता. आॅक्टोबर महिन्यामध्ये भगवा जातीच्या डाळिंबांचा सरासरी १३० रुपये किलोपर्यंत दर गेला होता. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून दरात चढ-उतार सुरू आहे.चन्नई, हैदराबाद, बेंगलोर, नागपूर, दिल्ली, लखनौ या बाजारपेठांमध्ये दलाल, व्यापारी व फळबाग खरेदी-विक्री संघामार्फत माल पाठविला जातो. पण अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने डाळिंबाची महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या चन्नईत अवकाळी पावसाने मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे डाळिंबाच्या दरात कमालीची घसरण झाली आहे.गेल्या १५ दिवसांपासून गणेश डाळिंबाचा दर ३० ते ३५ रुपये किलो दर झाला आहे. केशर डाळिंबाचा दर ४५ ते ५५ रुपये किलो झाला आहे. सोलापूर, सांगोला, आटपाडी, सांगली, बाजार समितीच्या सौदे बाजारात क्वचितच गणेश डाळिंबाला ३२ रुपये, केशरला ४५ रुपये दर मिळतो. सध्या गणेश ३० रुपये, केशर ४२ रुपये, भगवा ४० रुपये असा सरासरी दर मिळत आहे.जूनमध्ये हंगाम धरलेल्या बागांची डाळिंब विक्री सुरू आहे. मात्र अवकाळी पावसामुळे दर नसल्याने शेतकऱ्यांनी फळांची तोडणी लांबवली आहे. पण येत्या १५ ते २० दिवसांत दर न वाढल्यास शेतकऱ्यांना मिळेल त्या भागात डाळिंब विक्री करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. व्यथा शेतकऱ्यांच्या...कष्टाने डाळिंब बागा वाढवल्या. महागडी औषधे, खते व मशागतीवर लाखो रुपये खर्च केले आहेत. दर्जेदार उत्पादन करूनही अवकाळीने दर कमी आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.- आप्पासाहेब चिकाटी, डाळिंब उत्पादक शेतकरी, दरीबडची डाळिंबाची मोठी बाजारपेठ चेन्नई आहे. तेथे पाऊस असल्याने बाजारात आवक कमी असल्याने दर कमी झाला आहे. थोड्या दिवसांनी दरात वाढ होईल, अशी आशा वाटते.- चिदानंद कोळी, डाळिंब व्यापारीप्रश्न सध्याच्या दराचाडाळिंब जातआॅक्टो.-नोव्हेंबरचा दरसध्याचा दरगणेश४५ ते ५२ रुपये२५ ते ३२ रुपयेकेशर ९० ते ११० ४५ ते ५० भगवा १०० ते १३०५० ते ५५ कर्जाची परतफेड कशी होणारशेतकऱ्यांनी बागांवर सोसायटी, बॅँक, खासगी सावकाराचे कर्ज काढलेले आहे. पण दर कमी झाल्याने त्याची परतफेड कशी होणार? हा प्रश्न डाळिंब बागायतदार शेतकऱ्यांसमोर आ वासून उभा आहे.