शहरं
Join us  
Trending Stories
1
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर पुणे पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
4
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेसमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
5
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
6
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
7
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
8
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
9
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
10
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
11
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
12
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
13
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
14
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
15
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
16
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
17
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
18
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
19
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
20
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश

Lok Sabha Election 2019 सांगली, मिरज शहरातील मतदान युती-आघाडीला ठरणार भारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 00:16 IST

अशोक डोंबाळे। लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : मोदी लाटेवर स्वार झालेले भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्यापुढे जत, कवठेमहांकाळ, मिरज, ...

अशोक डोंबाळे।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : मोदी लाटेवर स्वार झालेले भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्यापुढे जत, कवठेमहांकाळ, मिरज, सांगलीतील मताधिक्य टिकविण्याचे मोठे आव्हान आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विशाल पाटील यांच्यासाठी काँग्रेसचे बालेकिल्ले असलेली सांगली, मिरज, जत ही शहरे महत्त्वाची, तर वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांची जत, उमदी, कवठेमहांकाळ शहरांवरच भिस्त आहे.२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मराठा, धनगर, मुस्लिम समाज आरक्षणाच्या प्रश्नावर प्रचंड आक्रमक झाला होता. लिंगायत समाजाची स्वतंत्र धर्मासह आरक्षणाची मागणीही तेवढीच महत्त्वाची होती. यामुळे काँग्रेसविरोधात प्रचंड असंतोष होता. बेरोजगारी हटाव आणि शेतीला हमीभाव देण्याची आश्वासने देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हायटेक प्रचार यंत्रणा राबविली. या मोदी लाटेतच सांगली लोकसभेच्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावून संजय पाटील यांच्या रूपाने कमळ फुलले. पाच वर्षांत प्रचंड घडामोडी घडल्या. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असून, धनगर, मुस्लिम समाजाचे आरक्षण आणि लिंगायत समाजाच्या स्वतंत्र धर्माच्या मागणीकडे भाजप सरकारने ढुंकूनही पाहिले नाही. त्यामुळे गतवेळी मताधिक्य देणाऱ्या उमदी, संख, जत, कवठेमहांकाळ, मिरज, मालगाव, सांगली, माधवनगर या हक्काच्या मतदारसंघात मताधिक्य टिकविण्याचे फार मोठे आव्हान संजय पाटील त्यांच्यासमोर असणार आहे. भाजपमधील असंतोषासह मागील निवडणुकीतील त्यांचे स्टार प्रचारक धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकरांनी त्यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले आहे.भाजप विरोधातील असंतोषाच्या लाटेवर स्वार होण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील सज्ज झाले आहेत. जत, उमदी, संख, कवठेमहांकाळ, मालगाव, मिरज, सांगलीतील दादाप्रेमी तरुणांसह वयोवृध्दांच्या भेटी घेऊन बालेकिल्ल्यांची डागडुजी करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टींनी भक्कम पाठबळ दिले आहे. जत, उमदीमध्ये काँग्रेसचे विक्रम सावंत, राष्ट्रवादीचे सुरेश शिंदे, अ‍ॅड. चन्नाप्पा होर्तीकर त्यांच्या मदतीला धावून आल्याचे दिसत आहे. सांगली, मिरज, मालगाव, माधवनगरमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची फौजही त्यांच्या कामी येताना दिसत आहे.गोपीचंद पडळकर हेही मराठा, धनगर, मुस्लिम समाजाच्या आरक्षणासह लिंगायत समाजाच्या स्वतंत्र धर्माच्या मागणीबाबत भाजपकडून कशी फसवणूक झाली, हे मांडत आहेत. धनगर आणि दलित, ओबीसी मतदारांवर त्यांची मोठी भिस्त आहे. जत, उमदी, संख, कवठेमहांकाळ शहरावर त्यांची भिस्त आहे.संजयकाका पाटील : २०१४ च्या निवडणुकीत त्यांना सांगली, जत, मिरज शहरातून मोठे मताधिक्य होते. आताही पहिल्या क्रमांकाची मते मिळावीत, ही त्यांच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. होमग्राऊंड तासगाव शहर आणि तालुक्याकडून त्यांची मोठी अपेक्षा असेलविशाल पाटील : सांगली, मिरज, भोसे, मालगाव येथील एकगठ्ठा मतांवर लक्ष असेल. कवठेमहांकाळ, जत मधील दादाप्रेमी गटही रिचार्ज केला आहे. पलूसमधील भिलवडी, अंकलखोप या मोठ्या गावांमधील वसंतदादा कारखान्याचे सभासद, संचालकांवर मदार असेल.गोपीचंद पडळकर : होमग्राऊंड आटपाडी तालुक्यातील खरसुंडी, झरे, करगणी परिसरावर भिस्त असेल. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारीमुळे कवठेमहांकाळ, जत, मिरज, आटपाडी तालुक्यातील धनगर, दलित, मुस्लिम, ओबीसीच्या एकगठ्ठा मतदारांवर लक्ष केंद्रित केले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक