शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

कासेगावात शिवाजीराव नाईक कार्यकर्त्यांत गटाचे राजकारण

By admin | Updated: January 14, 2015 23:18 IST

२00९ च्या निवडणुकीनंतर दोन्ही गटात तीव्र मतभेद झाल्याने बी. डी. पाटील गटाने त्यावेळी मानसिंगराव नाईक यांचे काम केले, तर शिंदे गटाने शिवाजीरावांना साथ दिली होती.

कासेगाव : कासेगाव (ता. वाळवा) येथील शिवाजीराव नाईक समर्थकांत अंतर्गत गट पडले आहेत. प्रत्येकाने स्वतंत्र गट तयार केल्याने गावात नेमका विरोधक कोण? असा सवाल उपस्थित होत आहे. यामुळे ग्रामस्थांत साशंकता निर्माण झाली आहे.कासेगावात विरोधी गट प्रबळ असला तरी, त्याला फुटीचे ग्रहण लागले आहे. गावात आज प्रामुख्याने विरोधात दोन गट आहेत. काँगे्रसची जवळीक असणारा अ‍ॅड. बी. डी. पाटील यांचा एक गट, तर ज्येष्ठ स्वा.सै. बापू शिंदे (सरकार) यांचा दुसरा गट. पूर्वी हे दोन्ही गट शिवाजीराव नाईक यांचे काम करीत होते. मात्र २00९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर या दोन्ही गटात तीव्र मतभेद झाल्याने बी. डी. पाटील गटाने त्यावेळी मानसिंगराव नाईक यांचे काम केले होते, तर शिंदे गटाने शिवाजीरावांना साथ दिली होती. तेंव्हापासून दोन्ही गटातील कार्यकर्ते एकमेकांचे पाय ओढण्याची एकही संधी सोडत नाहीत. नेताजी पाटील यांना मानणारा मोठा गट आहे. मात्र त्यांचा मुक्काम गावात कमी आणि मुंबई, पुण्यातच जास्त असल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत.लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत गावातून राजू शेट्टी आणि शिवाजीराव नाईक यांना मताधिक्य मिळाले. हे मताधिक्य माझ्यामुळेच गेले आहे, असे म्हणून प्रत्येकजण स्वत:चीच पाठ थोपटून घेत आहे. शिवाजीराव नाईक गटातील प्रत्येक कार्यकर्त्याचा एक स्वतंत्र गट असल्याने ते प्रत्येकवेळी एकमेकांवर कुरघोड्या करीत आहेत. नाईक दौऱ्यावर येतात त्यावेळी हे सर्व गट स्वतंत्रपणे त्यांच्या मागे—पुढे करताना दिसतात. एकूणच या अनेक गटांमुळे गावातील नक्की विरोधक गट कोण? असा सवाल ग्रामस्थांना पडत आहे. (वार्ताहर)गावात अपुरा व अनियमित पाणी पुरवठा, अस्वच्छता, अंतर्गत खराब रस्ते, गटारी स्वच्छता आदी समस्या आहेत. विरोधकांत एकी नसल्याने हे प्रश्न जैसे थे आहेत. मध्यंतरी दारूबंदीबाबत विरोधक आक्रमक झाले होते. त्यानंतर ते शांतच आहेत. यामागे काय गौडबंगाल आहे? अशी चर्चा ग्रामस्थांत आहे.