शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणाचे रंग बदलले...

By admin | Updated: December 16, 2014 00:05 IST

प्रत्येक क्षेत्रात जे घडले त्याच्याकडे मागे वळून पाहताना काय घडायला हवे होते व ते का घडले नाही, याचा लेखाजोखा मांडण्याचा ‘लोकमत’चा हा प्रयत्न..!

अनेक बऱ्या-वाईट घटना-घडामोडींचे साक्षीदार असलेले २०१४ हे वर्ष काही दिवसात काळाच्या पडद्यआड कायमचे लुप्त होत आहे. नव्या वर्षाच्या उदरात नक्की काय लपले आहे, याचा अंदाज बांधणे तर अशक्यच; परंतु तरीही नवा सूर्य आशेचे, उत्साहाचे किरण घेऊन येईल, अशी आशा बाळगायला हरकत नाही. प्रत्येक क्षेत्रात जे घडले त्याच्याकडे मागे वळून पाहताना काय घडायला हवे होते व ते का घडले नाही, याचा लेखाजोखा मांडण्याचा ‘लोकमत’चा हा प्रयत्न..!सांगली  : जिल्ह्याच्या राजकारणाचे रंग आणि समीकरणे बदलण्याचे काम सरत्या वर्षाने केले. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला धक्का देत भाजपने जोरदार मुसंडी मारली. त्यातच दोन्ही काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजपमध्ये उडी मारून राजकीय अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्याच्या राजकारणाचा बदललेला हा प्रवाह आता कोणत्या दिशेने जाणार, हा नव्या वर्षातील उत्सुकतेचा विषय असणार आहे. वर्षाची सुरुवातच लोकसभेच्या निवडणूक वातावरणाने झाली. लोकसभेच्या इतिहासात सांगली हा काँग्रेसचा अभेद्य बालेकिल्ला समजला जात होता. या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्याची भीष्मप्रतिज्ञा भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी सांगलीत केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांनी हीच प्रतिज्ञा अधोरेखीतही केली. मोदी लाटेचा परिणाम सांगलीत होणार नाही, असा आत्मविश्वास काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेतेही व्यक्त करीत होते. लोकसभेच्या निमित्ताने गेल्या अनेक वर्षांत न घडलेला दोन्ही काँग्रेसच्या मनोमीलनाचा प्रयत्न यशस्वी झाला. दोन्ही काँग्रेसचे नेते एकत्रितपणे काम करू लागले. पण दोन्ही काँग्रेसने पाळलेला आघाडी धर्म जिल्ह्यातील निकालावर परिणाम करू शकला नाही. मोदी लाटेत काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळला. माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांचा दारुण पराभव झाला. हातकणंगले मतदारसंघातूनही काँग्रेसला पराभूत व्हावे लागले.लोकसभेचाच कित्ता पुन्हा विधानसभेला गिरविला गेला. सांगली जिल्ह्यात तब्बल चार जागा जिंकून भाजप जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला. अनिल बाबर यांच्यारूपाने शिवसेनेने जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच याठिकाणी खाते उघडले. राष्ट्रवादीला दोन, तर काँग्रेसला एकाच जागेवर समाधान मानावे लागले. याला अनेक कारणेही होती. जिल्ह्यातील अर्धा डझन नेते राष्ट्रवादी व काँग्रेस सोडून भाजपमध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे विधानसभेत भाजपला अनपेक्षित यश मिळाले. खासदार संजय पाटील, विलासराव जगताप, अजितराव घोरपडे, शिवाजीराव नाईक, पृथ्वीराज देशमुख आदी नेत्यांनी भाजपमध्ये, तर अनिल बाबर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे या दोन्ही पक्षांची ताकद वाढली. भाजप, स्वाभिमानीच्या लोकांनीही तिकिटासाठी शिवसेना व अन्य पक्षात उड्या मारल्या. राज्यातील सत्ता बदलामुळेही गेल्या अनेक वर्षांत सत्तेत असणाऱ्या राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नेतेमंडळींची यंदा राजकीय गोची झाली. एकूणच राजकारणाचे रंग व राजकारणाचा प्रवाहच बदलणारे हे वर्ष ठरले. (प्रतिनिधी)दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का लोकसभेला वसंतदादांचे नातू प्रतीक पाटील आणि विधानसभेला मदन पाटील यांचा पराभव झाला. त्यामुळे वसंतदादा घराण्याच्या अस्तित्वाबद्दचा प्रश्न निर्माण झाला. खानापूरमधून सदाशिवराव पाटील, तासगाव-कवठेमहांकाळमधून अजितराव घोरपडे, शिराळ््यातून मानसिंगराव नाईक, कडेगावमधून पृथ्वीराज देशमुख, जतमधून प्रकाश शेंडगे आदी दिग्गज नेत्यांनाही पराभवाचा धक्का सहन करावा लागला.लाल दिवा गेलागेल्या अनेक वर्षांपासून मंत्र्यांची खाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगली जिल्ह्याला प्रथमच मंत्रीपदापासून वंचित रहावे लागले. लाल दिवा येईल, या अपेक्षेने भाजपचे नेते प्रयत्न करीत होते. प्रत्यक्षात परंपरेत खंड पडला आणि जिल्हा लाल दिव्यापासून वंचितच राहिला.