शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या सुट्ट्या, रजांवर गदा..!

By admin | Updated: August 31, 2014 00:15 IST

दोन महिने बंदोबस्त : उत्सवांपाठोपाठ निवडणूक

सचिन लाड / सांगलीगणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव या दोन सणांपाठोपाठ विधानसभा निवडणूक येणार असल्याने जिल्ह्यातील पोलिसांना आता दोन महिने अविश्रांत बंदोबस्तावर थांबावे लागणार आहे. गृहखात्याने त्यांच्या साप्ताहिक सुट्ट्या व रजाही बंद केल्या आहेत. त्यामुळे पोलिसांच्या शारीरिक क्षमतेची कसोटीच जणू पाहिली जाणार आहे. बंदोबस्तामुळे पोलीस ठाण्यातील दैनंदिन कामकाजासह तपासावर परिणाम होणार आहे. सध्या गणेशोत्सव सुरू आहे. हा उत्सव शांततेत पार पाडण्याची जबाबदारी पोलिसांवरच असते. सकाळी नऊपासूृन रात्री दोनपर्यंत कडक पहारा ठेवावा लागत आहे. या दहा दिवसांनंतर नवरात्रोत्सव आहे. सांगलीत पहाटे दुर्गामाता दौड निघते, तर रात्री उशिरापर्यंत दांडियाचा खेळ सुरू असतो. या कालावधितही त्यांना रात्रंदिवस बंदोबस्त ठेवावा लागतो. या दोन उत्सवांतून पोलीस बाहेर पडतात, तोपर्यंत दिवाळी आणि विधानसभेची निवडणूक येत आहे. गणेशोत्सवापासून सुरू झालेला हा बंदोबस्त दोन महिने म्हणजे निवडणूक संपेपर्यंत राहणार आहे.