शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत उद्यापासून पोलिस भरती

By admin | Updated: March 20, 2017 23:44 IST

तयारी पूर्ण : रस्ते बंद राहणार; ५३ जागांसाठी चार हजार उमेदवारांचे अर्ज

सांगली : जिल्हा पोलिस दलातील पोलिस शिपाई या पदासाठी बुधवारपासून भरतीला प्रारंभ होत आहे. केवळ ५३ जागांसाठी ही भरती होत असून, यासाठी सुमारे चार हजार १४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. भरती प्रक्रियेच्या कालावधित सकाळी सहा ते दहापर्यंत जिल्हा परिषद अध्यक्षांचे निवासस्थान ते ट्रॅफिक पार्क-कृष्णा मॅरेज हॉल मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवला आहे.भरतीसाठी आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. अर्ज दाखल करण्याची सोमवारी शेवटची मुदत होती. सायंकाळपर्यंत चार हजार १४ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. विश्रामबाग येथील पोलिस मुख्यालयातील कवायत मैदानावर भरतीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे, अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख कृष्णकांत उपाध्याय यांनी सोमवारी भरतीच्या तयारीची पाहणी केली. अधिकारी व कर्मचाऱ्यांना काही सूचनाही दिल्या. २२ मार्चला (बुधवार) सकाळी दहा वाजता भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. दररोज दीड हजार उमेदवारांना बोलाविण्यात आले आहे. सकाळी सहा वाजता सह्याद्रीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कृष्णा मॅरेज हॉलच्या गेटमधून उमेदवारांना प्रवेश दिला जाणार आहे. भरतीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सकाळी सहा ते दहापर्यंत जिल्हा परिषद अध्यक्षांचे निवासस्थान ते ट्रॅफिक पार्क-कृष्णा मॅरेज हॉल मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला तसेच कुपवाड रस्त्यावरील चाणक्य हॉटेल ते मारूती मंदिर या मार्गावर सोळाशे मीटर धावणे घेतले जाणार असल्याने हा मार्गही सकाळी सहा ते दहापर्यंत बंद ठेवला आहे. (प्रतिनिधी)