शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘एक गाव-एक गणपती’साठी पोलिस पाटलांनी पुढाकार घ्यावा

By admin | Updated: July 27, 2016 01:06 IST

कृष्णांत पिंगळे : तासगाव तालुक्यातील पोलिस पाटलांना मार्गदर्शन

तासगाव : पोलिसपाटील पदाच्या माध्यमातून गावाचे हित साधण्यासाठी खूप मोठी संधी आहे. त्याची सुरुवात गणेशोत्सवापासून करा. ‘एक गाव एक गणपती’साठी पोलिस पाटलांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पोलिस उपअधीक्षक कृष्णांत पिंगळे यांनी केले.नव्याने नियुक्त झालेल्या पोलिस पाटलांना मार्गदर्शन करण्यासाठी तासगाव पोलिस ठाण्यात बैठक झाली. यावेळी तहसीलदार सुधाकर भोसले, पोलिस निरीक्षक मिलिंद पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक धनाजी पिसाळ उपस्थित होते. पोलिस उपअधीक्षक पिंगळे म्हणाले, पोलिसपाटील हा गावाच्या एकात्मतेसाठी महत्त्वाचा घटक आहे. प्रशासन आणि जनतेमधील दुवा म्हणून पोलिस पाटलांनी काम करावे. गावातील अवैध, बेकायदा धंदे मोडीत काढण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे. गावातील एकात्मता कायम ठेवण्यासाठी, जाती, धर्म, राजकारण, गट-तट बाजूला ठेवून पोलिस पाटलांचे काम व्हायला हवे. त्याची सुरुवात गणेशोत्सवापासून करा. तालुक्यातील प्रत्येक गावात ‘एक गाव एक गणपती’साठी पुढाकार घ्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.तहसीलदार सुधाकर भोसले यांनीही महसूल यंत्रणेबाबत पोलिस पाटलांच्या भूमिकेबाबत मार्गदर्शन केले. बेकायदा कामांना आळा घालण्यासाठी पोलिस पाटलांची कामगिरी महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)गावनिहाय बैठका ‘एक गाव, एक गणपती’साठी लवकरच गावनिहाय बैठका घेण्यात येणार आहेत. गावातील सर्व मंडळांना एकत्रित बोलावून अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात येईल. गतवर्षीप्रमाणे यावर्षीही डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मंडळांनी पुढाकार घ्यावा, यासाठी नियोजन करण्यात येत असल्याचे पिंगळे यांनी सांगितले.