शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसावर हल्ला करून चोरटा पसार पोलीस जखमी : साखराळेत पकडून नेताना प्रकार

By admin | Updated: May 9, 2014 00:08 IST

इस्लामपूर : साखराळे (ता. वाळवा) येथील एका सराईत चोरट्याने त्याला पकडून नेणार्‍या पोलीस कर्मचार्‍यावर हल्ला करुन जखमी केल्याची घटना घडली

इस्लामपूर : साखराळे (ता. वाळवा) येथील एका सराईत चोरट्याने त्याला पकडून नेणार्‍या पोलीस कर्मचार्‍यावर हल्ला करुन जखमी केल्याची घटना घडली. हा प्रकार आज (गुरुवार) दुपारी दीडच्या सुमारास राजारामबापू कारखाना कामगारांच्या कॉलनीजवळ घडला. यातील हल्लेखोर फरारी झाला आहे. शाम जोसेफ पांढरे असे जखमी पोलिसाचे नाव आहे, तर विवेक विलास कदम हा हल्लेखोर आहे. त्याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणून कर्तव्यावर असताना मारहाण करून जखमी केल्याचा ठपका ठेवत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबतची माहिती अशी, विवेक कदम हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत चोरटा आहे. त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे नोंद आहेत. तो फरारी होता. आज दुपारी शाम पांढरे हे पोलीस शिपाई दिलीप महाले यांना सोबतीला घेऊन विवेक कदम याला ताब्यात घेण्यासाठी साखराळेमधील त्याच्या घरी गेले. पांढरे व महाले यांनी त्याला ताब्यात घेतले. तेथून रिक्षा (एमडब्ल्यूई ४0९९) मधून विवेक कदम याला इस्लामपूर पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना कारखाना कॉलनीजवळ कदम याने पांढरे यांचे डोके रिक्षातील लोखंडी भागावर आपटले. त्यानंतर त्यांना चालत्या रिक्षातून खाली ढकलून दिले. तेथे पुन्हा लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी त्याला प्रतिकार करणार्‍या महाले यांनाही त्याने जुमानले नाही. या घटनेत रिक्षाचीही काच फुटून नुकसान झाले. हा प्रकार घडल्यानंतर कदम याने तेथून पोबारा केला. पांढरे यांच्या डोक्यास, हातास जखमा झाल्या आहेत. उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांनी पोलिसांत फिर्याद दिली. (वार्ताहर)