शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
2
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
3
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
4
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
5
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
6
कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
7
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
8
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
9
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!
10
मराठ्यांचा इतिहास लोकांपर्यंत पुरेसा पोहचला नाही, इंग्रजांसह स्वकीयही जबाबदार- मुख्यमंत्री फडणवीस
11
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
12
“कोकणच्या हिताचे चांगले काम करा, टीकेत अडकून राहू नका”; भास्कर जाधवांचा योगेश कदमांना सल्ला
13
Maharashtran Rains: दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता 
14
तेजीनंतर पुन्हा सोन्या-चांदीच्या दरात घसरण, तरीही चांदी १.१० लाखांच्या पार; खरेदीपूर्वी पाहा नवे दर
15
PM मोदींना त्रिनिदादमध्ये सोहरीच्या पानावर वाढलं गेलं जेवण; भारताशी कनेक्शन अन् फायदे काय?
16
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
17
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
18
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
19
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
20
श्रेया, भाऊ कोहिनूर हिरे पण 'तो' भंगारवाला? शरद उपाध्येंची ६ वर्षांपूर्वीची 'ती' पोस्ट व्हायरल

महामार्गावर पोलिसांची ‘हप्तेबाजी’

By admin | Updated: October 18, 2015 23:56 IST

कासेगाव हद्दीतील प्रकार : कागदपत्रे तपासणीच्या नावाखाली आर्थिक पिळवणूक

कासेगाव : कासेगाव (ता. वाळवा) येथील मालखेड फाट्यानजीक कासेगाव हद्दीत महामार्ग पोलिसांनी पुन्हा एकदा ‘हप्ता वसुली’ जोरात सुरु केली आहे. शनिवारी सायंकाळी ६ च्या सुमारास दोन गाड्यांतून आठ कर्मचारी जबरदस्तीने वाहनचालकांना अडवून, कागदपत्रे तपासणीच्या बहाण्याने लुबाडत होते.कासेगाव येथील पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मालखेड फाट्यानजीक कासेगाव हद्दीत महामार्ग पोलीस वाहनधारकांना वेठीस धरून त्यांची आर्थिक पिळवणूक करीत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेऊन जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी यांनी महामार्ग पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली होती. त्यानंतर हे पोलीस या ठिकाणापासून बेपत्ता होते. त्यामुळे नागरिकांसह वाहनधारकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला होता. त्यानंतर हे महामार्ग पोलीस वाठार, पाचवड या ठिकाणी थांबत होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून या महामार्गावर पुन्हा हे पोलीस थांबून वाहनधारकांना त्रास देऊ लागले आहेत. दुचाकीस्वारांनाही अडवून, कागदपत्रांच्या नावाखाली त्यांची आर्थिक पिळवणूक करु लागले आहेत.शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास हे हायवे पोलीस दोन पोलीस गाड्यांतून या ठिकाणी थांबले होते. चारचाकी, दोनचाकी वाहनांना ते अडवत होते. कागदपत्रांची मागणी करुन, ती न दाखविल्यास कायद्याचा धाक दाखवून पैशाची मागणी करत होते. काही वेळेस वाहनधारकव त्यांच्यात बाचाबाचीही झाली. परंतु पैसे घेतल्याशिवाय ते वाहनांना जाऊ देत नव्हते. (वार्ताहर)पठाणी बडगा : वसुलीसाठी कुरकुरे, चिक्कीहीआठ कर्मचाऱ्यांनी मिळून काही वेळातच बरीच माया गोळा करुन त्या ठिकाणाहून पोबारा केला. ही वसुली पुन्हा सुरु झाल्याने वाहनधारकांतून नाराजी व्यक्त होत आहे. इस्लामपूर-कराडदरम्यान प्रवासी वाहतूक करणाऱ्या शेकडो वाहनांची येथे दररोज वर्दळ असते. या वडापचालकांना या पथकाने लक्ष्य केल्याचे दिसते. मध्यंतरी कऱ्हाडमधून खाद्यपदार्थांची वाहतूक करणाऱ्या एका वाहनचालकाला अडवून पैशाची मागणी केली. त्याने पैसे देण्यास असमर्थता दर्शविल्यावर या पथकाने चक्क त्याच्या वाहनातील कुरकुरे, शेंगदाणा चिक्कीचे बॉक्स काढून घेतले. अशा पठाणी वसुलीमुळे वाहनधारक त्रस्त असून, तातडीने या वसुली टोळीवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.