शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रश्नपत्रिका काढणाऱ्यांची माहिती पोलिसांनी मागविली

By admin | Updated: December 6, 2015 00:32 IST

आणखी दोघे ताब्यात : आरोग्य सेवकांची चौकशी सुरूच

सांगली : जिल्हा परिषदेच्या रिक्त असलेल्या आरोग्यसेविका पदाच्या परीक्षेच्या पेपर फुटीप्रकरणी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील आणखी दोन कर्मचाऱ्यांना शनिवारी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, प्रश्नपत्रिका काढण्याच्या प्रक्रियेत कोण अधिकारी व कर्मचारी होते, याची तातडीने माहिती सादर करण्याचा आदेश पोलीस उपअधीक्षक प्रकाश गायकवाड यांनी दिला आहे. दरम्यान, ताब्यात घेतलेल्या दोन आरोग्य सेवकांची अद्यापही चौकशी सुरु आहे. त्यांचा यामध्ये हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या आठवड्यात जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेविका भरती परीक्षेत पेपरफुटीचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी कंत्राटी सेविका म्हणून कार्यरत असलेल्या व परीक्षेसाठी परीक्षार्थी म्हणून बसलेल्या शाहीन जमादार हिला कॉपी करुन पेपर लिहित असताना रंगेहात पकडण्यात आले होते. तिच्यासह तिला मदत करणारी नियमित आरोग्यसेविका शकिरा उमारणी या दोघींविरुद्ध सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. चार दिवसाच्या चौकशीनंतर दोघींना गुरुवारी रात्री अटक केली होती. पण त्यांना दुसऱ्यादिवशी लगेच जामीन मंजूर झाला होता. त्यांच्या चौकशीतून तासगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील दोन आरोग्य सेवकांची नावे निष्पन्न झाली होती. हे दोन्ही आरोग्य मिरज तालुक्यातील आहेत. गेल्या दोन दिवसापासून त्यांची चौकशी सुरु आहेत. चौकशीतून त्यांच्याकडून महत्त्वाची माहिती पुढे आले आहेत. पण तपासाच्याद्दष्टीने पोलिसांनी गोपनीयता बाळगून ती सांगण्यास नकार दिला. आरोग्य सेविका भरतीची प्रश्नपत्रिका (पेपर) जिल्हा परिषदेकडून काढण्यात आली होती. या प्रक्रियेत किती अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग होता? प्रश्नपत्रिकेची छपाई कुठे करण्यात आली? छपाईवेळी छपाई कारखान्यात कोण-कोण उपस्थित होते? परीक्षा होईपर्यंत त्यांना तिथेच ठेवले होते का? त्यांच्याकडे मोबाईल होते का? याची सर्व माहिती तातडीने द्यावी, असा आदेश दिला आहे. पण हे प्रकरण उघडकीस आल्यापासून पोलिसांनी तपासात काही कागदपत्रांची मागणी केली होती. मात्र ती देण्यास जिल्हा परिषदेकडून टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिका काढण्याच्या प्रक्रियेत सहभागी असणाऱ्यांची माहिती तातडीने देण्यास सांगितले आहे. एकतर प्रश्नपत्रिका छपाईपूर्वी बाहेर पडली असण्याची शक्यता आहे किंवा छपाई केल्यानंतरही ती बाहेर काढली असावी, असा अंदाज आहे. त्याद्दष्टीने तपासाची चक्रे फिरविली जात आहेत. (प्रतिनिधी)