शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

कवठेमहांकाळमध्ये तरुणाचे मुंडके छाटले

By admin | Updated: November 3, 2016 00:02 IST

थबडेवाडी चौकातील घटना : छातीवर, गळ्यावर तलवार, कुऱ्हाड, कोयत्याने सपासप वार

 कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ शहरातील जत-कवठेमहांकाळ रस्त्यावरील गजबजलेल्या थबडेवाडी चौकात अर्जुन बाळकृष्ण आटपाडकर (४४, रा. थबडेवाडी, ता. कवठेमहांकाळ) याचा अज्ञात हल्लेखोरांनी छातीवर, गळ्यावर, डोक्यात, पोटावर तलवार, कोयता, कुऱ्हाडीने सपासप वार करीत मुंडके छाटून निर्घृण खून केला. मृतदेह रस्त्यावर टाकून हल्लेखोर पसार झाले. भर चौकात खून झाल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ माजली आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी सात वाजता घडली. अर्जुन आटपाडकर थबडेवाडीचा रहिवासी आहे. तो खासगी वाहतुकीच्या जीपवर चालक होता. सायंकाळी पावणेसात वाजता तो खासगी वाहतुकीची काळी-पिवळी जीप घेऊन कवठेमहांकाळ-जत रस्त्यावरील थबडेवाडी चौकात आला होता. गाडी रस्त्याच्या कडेला उभी करून तो थबडेवाडी रस्त्याने चौकाच्या मुख्य ठिकाणी येत होता. त्याचवेळी पाठीमागून तीन ते चार हल्लेखोर दुचाकीवरून आले. त्यांनी तलवार, कुऱ्हाड, कोयत्याने अर्जुन आटपाडकरच्या डोक्यात, गळ्यावर, छातीवर, पोटावर सपासप वार केले. हे घाव एवढे वर्मी होते की, आटपाडकरचे शिर तुटले. हल्लेखोरांनी परत त्यास पायाला धरून ओढत आणून भररस्त्यावर वार करून त्याचे शिर तोडले. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले. या हल्लेखोरांनी तोंडाला काहीही बांधले नव्हते, अशी चर्चा घटनास्थळी होती. या निर्घृण खुनाची बातमी वाऱ्यासारखी तालुक्यात पसरली. थबडेवाडी चौकात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. चौकातील दुकाने, हॉटेल्स पटापट बंद झाली होती. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठविला. रुग्णालयात आटपाडकरच्या नातेवाइकांनी गर्दी केली होती. त्यांचा आक्रोश सुरू होता. पोलिस निरीक्षक सिराज इनामदार अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर) खुनाचे कारण अस्पष्ट खुनाबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. खुनाचे नेमके कारण अस्पष्ट असून, पोलिस घटनास्थळावर उपलब्ध माहितीवरून हल्लेखोरांच्या शोधासाठी रवाना झाले आहेत.