शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
5
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
6
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
7
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
8
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
9
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
10
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
11
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
12
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
13
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
14
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
15
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
16
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
17
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
18
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
19
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
20
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?

इस्लामपुरातील भूखंड हडप करण्याचा डाव

By admin | Updated: November 28, 2014 23:42 IST

विक्रम पाटील : कासेगाव शिक्षण संस्थेवर आरोप

इस्लामपूर : कासेगाव शिक्षण संस्थेने यापूर्वी शहरातील शिराळा नाका, उपजिल्हा रुग्णालय परिसरातील मोक्याचे भूखंड हडप करून तेथे बेकायदेशीर बांधकामे केली आहेत. आता क्रांतिसिंह नाना पाटील नगराच्या पूर्वेस असणारा अंदाजे १० कोटी रुपये किमतीचा पाच एकर क्षेत्रातील भूखंड हडपण्याचा डाव आखला आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत या संस्थेला हा भूखंड मिळू देणार नाही, याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांसह शासनाकडे तक्रार करणार असल्याची माहिती भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पाटील व नगरसेवक विजय कुंभार यांनी पत्रकार परिषदेत दिली.विक्रम पाटील म्हणाले की, गेली १५ वर्षे राज्यात आघाडीचे सरकार असताना शहराच्या वैभवात भर घालणारी एकही मोठी योजना जयंत पाटील यांनी राबवली नाही. सत्तेच्या माध्यमातून पैसा व पैशातून सत्ता ही नीती वापरुन त्यांनी पालिकेतील सत्ता टिकवली आहे. या सत्तेच्या जोरावरच मोक्याचे भूखंड हडप करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव आहे. कासेगाव शिक्षण संस्थेला यापूर्वी शिराळा नाका परिसरातील भूखंड देण्यात आला. तेथे बेकायदेशीरपणे संरक्षक भिंतीचे बांधकाम केले. त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयासमोरील भूखंड मिळवून तेथेही ६० फुटी रस्त्यामध्येच बेकायदेशीर बांधकाम सुरु केले होते. आता पुन्हा स. नं. ९९३/१ येथील ५ एकर शासकीय जागा मागणीचा डाव आहे. पालिकेतील मुख्याधिकारी व नगररचनाकारांनी या मागणीला आक्षेप नोंदवायला हवा होता. मात्र त्यांनीही सत्ताधाऱ्यांशी संगनमत करताना ना हरकत प्रमाणपत्र देण्यास संमती दिली आहे, ही बाब गंभीर आहे.कोणत्याही परिस्थितीत हा भूखंड कासेगाव शिक्षण संस्थेला मिळू देणार नाही. हा भूखंड जनतेच्या मालकीचा राहण्यासाठी प्रसंगी संघर्ष करण्याचा इशारा त्यांनी दिला. (वार्ताहर)बेकायदेशीर बांधकामेशिराळा नाका परिसरातील सर्व्हे नं. ७८ मधील भूखंड देण्यात आला. तेथे विकास आराखड्यातील ८० फुटी रस्त्याच्या आरक्षणात बेकायदेशीरपणे संरक्षक भिंतीचे बांधकाम केले. त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयासमोरील स. नं. १६२ मधील भूखंड मिळवून तेथेही विकास आराखड्यातील ६० फुटी रस्त्यामध्येच बेकायदेशीर बांधकाम सुरु केले होते. आता पुन्हा स. नं. ९९३/१ येथील ५ एकर शासकीय जागा मागणीचा डाव आखला आहे.