शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कामाची स्थिती तपासूनच अनामत परत द्या: संग्रामसिंह देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 23:52 IST

सांगली : जिल्हा परिषदेकडील काही ठेकेदार अतिशय कमी दराने निविदा दाखल करतात. त्यातून निकृट दर्जाची कामे होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे सरसकट ठेकेदारांना चोवीस महिन्यांनी देण्यात येणारी अनामत रक्कम कामांची स्थिती तपासल्याशिवाय देऊ नका, असे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी शुक्रवारी दिले.देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची बैठक ...

सांगली : जिल्हा परिषदेकडील काही ठेकेदार अतिशय कमी दराने निविदा दाखल करतात. त्यातून निकृट दर्जाची कामे होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे सरसकट ठेकेदारांना चोवीस महिन्यांनी देण्यात येणारी अनामत रक्कम कामांची स्थिती तपासल्याशिवाय देऊ नका, असे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी शुक्रवारी दिले.देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची बैठक पार पडली. यावेळी उपाध्यक्ष सुहास बाबर, सभापती अरूण राजमाने, ब्रम्हानंद पडळकर, प्रा. सुषमा नायकवडी, तम्मणगौडा रवी-पाटील, अर्जुन पाटील, डी. के. पाटील, नितीन नवले, सुनीता पवार, अश्विनी पाटील उपस्थित होते.ठेकेदारांकडून निविदा भरताना दहा टक्के अनामत रक्कम घेण्यात येते. काम पूर्ण झाल्यानंतर चोवीस महिन्यांनंतर ही रक्कम संबंधित ठेकेदारांना परत देण्यात येते. काही ठेकेदार कमी दराच्या निविदा टाकून ठेका मिळवितात व संबंधित काम चांगल्या दर्जाचे करीत नाहीत. त्यामुळे सरसकट ठेकेदारांच्या अनामत रकमा देताना कामांची स्थिती बघूनच देण्याच्या सूचना देशमुख यांनी दिल्या.ग्रामपंचायतीकडील निधी खर्ची पडत नसल्याच्या तक्रारी सदस्यांनी सर्वसाधारण सभेत मांडल्या होत्या. मात्र नियोजनच्या निधीची परिस्थिती वेगळी नसल्याचे सदस्यांनी सभेत सांगितले. त्यावर जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा परिषदेला प्राप्त असणारा २०१६-१७ मधील अखर्चित निधी डिसेंबर २०१८ पूर्वी शंभर टक्के खर्च होण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. बांधकाम विभागाला रस्त्यांचा विशेष दुरूस्ती निधी ग्रामविकास निधीकडून येण्यासाठी बराच विलंब लागतो, त्यामुळे तो निधी पूर्वीप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत वितरित करण्यासाठी शासनाकडे विनंती प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.अंगणवाडी किंवा शाळाखोली बांधकामासाठी सध्या सहा लाख रूपयांची मर्यादा आहे. जीएसटी व डीएसआर वाढीमुळे इतक्या रकमेमध्ये इमारत होत नसल्याची समस्या सदस्यांनी मांडली. याबाबत कार्यकारी अभियंता यांनी यामध्ये तथ्य असल्याचे सांगितले. खोल्या बांधण्यासाठी आठ ते साडेआठ लाख रुपये मंजूर करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचा निर्णय झाला. तोपर्यंत ग्रामपंचायतीकडील चौदाव्या वित्त आयोगातून वरील निधीसाठी ग्रामपंचायतींचा ठराव घेऊन कामे करण्याच्या सूचना करण्यात आल्या.जिल्ह्यात तब्बल ४०६ कोटींच्या राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर झालेल्या आहेत. त्यांची अंदाजपत्रके तयार करण्यासाठी आपली यंत्रणा कमी पडू शकते, त्यामुळे सल्लागार अभियंता नेमण्यासाठी तात्काळ बांधकाम विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची बैठक घेऊन नियोजन करा, अशा सूचनाही देशमुख यांनी दिल्या.