मिरज : मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या आवारात राष्ट्र सेवा दलातर्फे वृक्षारोपण करण्यात आले. ऑक्सिजन जास्त प्रमाणात देणाऱ्या वृक्षांचे रोपण करण्यासाठी राष्ट्रसेवा दलाचे पदाधिकारी व वृक्षप्रेमी या उपक्रमात सहभागी होते.
राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय संघटक सदाशिव मगदूम जिल्हा कार्याध्यक्ष रामलिंग तोडकर, दिनकर आदाटे, रोहित शिंदे, शिवाजी दुर्गाडे, रमेश हेगाणे, शिवानंद हिप्पर्गी, प्रकाश पवार, शिवकुमार हेगाणे, कोमल मगदूम, आसावरी माळी, विजयेंद्र हरपनहळ्ळी, पार्थ हेगाणे, साहिल मदने, युवराज मगदूम, सतीश शेरबंदे, धनंजय पाठक, वर्षा पाठक, शिवाजी दुर्गाडे किरण कांबळे यांनी वृक्षारोपण केले.
मिरज सिव्हिलच्या प्रांगणात वृक्षांचे रोपण सुरू असल्याचे सदाशिव मगदूम, रामलिंग तोडकर यांनी सांगितले. ऑक्सिजन न मिळाल्याने मृत झालेल्यांची संख्या लक्षात घेऊन व सामाजिक बांधिलकी म्हणून ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या वृक्षांचे रोपण करण्यात येत आहे. या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन सदाशिव मगदूम यांनी केले.