शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

मोदी, फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांचे फोटो गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:29 IST

सांगली : महापालिकेच्या महापौर, उपमहापौर निवडीत भाजपचा पराभव झाल्यानंतर या दोघांच्या दालनातील पतंप्रधान नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ...

सांगली : महापालिकेच्या महापौर, उपमहापौर निवडीत भाजपचा पराभव झाल्यानंतर या दोघांच्या दालनातील पतंप्रधान नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह आमदार, खासदार आणि कोअर कमिटीच्या नेत्यांचे फोटो गायब झाले. आता त्यांच्या जागी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो लावण्याची घाईगडबड सुरू झाली आहे.

गेली अडीच वर्षे महापालिकेत भाजपची सत्ता होती. पहिल्यांदाच सत्ता मिळाल्याने महापौर,उपमहापौर, स्थायी सभापती, गटनेता या चारही कार्यालयात भाजप नेत्यांचे फोटो लावण्यात आले होते. त्यात पंतप्रधानांपासून राज्यातील नेत्यांचाही समावेश होता. तसेच स्थानिक आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, खासदार संजयकाका पाटील, कोअर कमिटीचे सदस्य दिनकर पाटील, दिलीप सूर्यवंशी, शेखर इनामदार यांच्या छायाचित्रांचा समावेश होता. बहुतांश कार्यालय हीच छायाचित्रे होती. पण मंगळवारी महापालिकेत सत्तांतर होताच महापौर व उपमहापौर कार्यालयातील ही छायाचित्रे गायब झाली होती. महापौर, उपमहापौरांनी पदभार हाती घेण्यापूर्वीच ती हटविण्यात आली होती. आता केवळ स्थायी सभापती व भाजप गटनेता या दोनच कार्यालय नेत्यांची छायाचित्रे असतील.

आता त्यांच्या जागी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री जयंत पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, जयश्रीताई पाटील, विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील यांची छायाचित्रे लावण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.