शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत गव्याचे दर्शन;नागरिकांमध्ये घबराट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 00:49 IST

सांगलीतील गजबजलेल्या गणपती मंदिराच्या पिछाडीस स्वामी समर्थ घाटावर रविवारी रात्री साडेदहा वाजता अचानक गव्याचे दर्शन झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.

सांगली : सांगलीतील गजबजलेल्या गणपती मंदिराच्या पिछाडीस स्वामी समर्थ घाटावर रविवारी रात्री साडेदहा वाजता अचानक गव्याचे दर्शन झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. शहरातील गवळी गल्ली, हरभट रोड, गणपती पेठ या गर्दीच्या ठिकाणी गवा दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. रात्री उशिरापर्यंत या परिसरात मोठा जमाव जमला होता. शनिवारी सुखवाडी (ता. पलूस) येथे दिसलेला हा गवा नदीकाठावरून शहरात शिरला असावा, असा अंदाज आहे.

रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास मगरमच्छ कॉलनी परिसरातील काही तरूणांना नदीकाठी गव्याचे दर्शन झाले. त्यांनी परिसरातील नागरिकांना याची माहिती देऊन आरडाओरड सुरू केली. पण अंधारातून काही क्षणात गवा गायब झाला. तो पुन्हा स्वामी समर्थ घाटावर दिसला. गणपती मंदिराच्या पाठीमागून तो पांजरपोळच्या दिशेने गेल्याचे नागरिकांनी पाहिले. त्यानंतर पुन्हा गवा गायब झाला. हरभट रोड परिसरात काहींनी त्याला पाहिले.

दरम्यान, बायपास रस्ता परिसरातील शेरीनाल्याच्या पंपहाऊसजवळ काहींनी या गव्यास पाहिले. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक सांगलीतील बायपास रस्ता परिसरात दाखल झाले. पथकाने बायपास रस्ता परिसरात शिवशंभो चौकापासून कर्नाळकडे जाणाºया रस्त्यावर शोध सुरू ठेवला होता. मात्र गव्याचा गणपतीपेठ परिसरातच रात्री उशिरापर्यंत लपंडाव सुरू होता.गवा ‘एटीएम’मध्ये!गवळी गल्लीतून हा गवा गणपती पेठेत घुसला. त्याला पाहून लोकांची पळापळ झाली. याच परिसरात असलेल्या एका एटीएममध्ये हा गवा घुसला. त्यानंतर तो काही वेळात बाहेर आला. यानंतर मोठा गदारोळ झाला.