शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

नाट्यगृहात भोजनावळीचा वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 23:20 IST

नाट्यगृहात भोजनावळीचा वाद

लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहात भोजन कार्यक्रमास बंदी असतानाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे आयोजित वैद्यकीय परिषदेसाठी विनापरवाना भोजन व्यवस्था केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. नाट्यगृहाच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाईची मागणी भाजप कार्यकर्ते प्रीतेन आसर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. मिरजेत महापालिकेने सुमारे तीन कोटी रूपये खर्चून बालगंधर्व नाट्यगृह उभारले आहे. या नाट्यगृहाचा मंगल कार्यालयाप्रमाणे वापर होऊ नये, यासाठी नाट्यगृह व परिसरात भोजन कार्यक्रमास बंदी घालण्यात आली आहे. मात्र मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे आयोजित तीनदिवसीय शैक्षणिक परिषदेसाठी नाट्यगृहात भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. नाट्यगृहात भोजन व्यवस्थेची परवानगी दिल्याची माहिती प्रीतेन आसर यांनी मागितल्यानंतर, महापालिका माहिती अधिकाऱ्यांनी परिषदेवेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने नाट्यगृहाचे भाडे भरले होते. मात्र भोजनाची परवानगी देण्यात आली नसल्याचा खुलासा केला आहे. नाट्यगृहात भोजनाची परवानगी नसताना सामूहिक भोजन व्यवस्था करून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांवर कारवाई करण्याची मागणी आसर यांनी निवेदानाद्वारे केली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी वेगळा नियम, हा नाट्यरसिक व नागरिकांवर अन्याय असल्याचेही आसर यांनी म्हटले आहे. आता याप्रकरणी महापालिका आयुक्त रवींद्र खेबूडकर नेमकी काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. पालिकेचे नियम : मोडल्याने वादनूतनीकरणापूर्वी मिरजेच्या याच नाट्यगृहाचा वापर मंगल कार्यालयासारखाच झाला होता. कालांतराने भंगार ठेवण्यासाठी नाट्यगृह वापरले जाऊ लागले होते. त्यामुळे महापालिकेवर नाट्यगृहाच्या दुरवस्थेवरून मोठा संताप व्यक्त झाला होता. नाट्यगृहाच्या नूतनीकरणानंतर पूर्वीच्या चुकांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सुरुवातीपासून पथ्य पाळण्यात आले होते. आता पुन्हा जेवणावळीने नाट्यगृह वादात सापडले आहे. सांगलीतही घडले होते प्रकारसांगलीत महापालिकेच्या मालकीचे मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह आहे. या नाट्यगृहाच्या नूतनीकरणापूर्वीही येथे जेवणावळ््यांच्या कार्यक्रमावरून वाद झाले होते. तमाशाचे कार्यक्रम, विविध संस्थांच्या सभांसाठी नाट्यगृह वापरण्यावरूनही वाद निर्माण झाले होते. बऱ्याचदा कार्यक्रमांमधील वादावादीमुळे नाट्यगृहातील खुर्र्च्यांचीही मोडतोड झाली होती.