शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत पेट्रोल १०४ रुपयांवर तर डिझेल शंभरीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:18 IST

सांगली : पेट्रोल आणि डिझेलची घोडदौड अजूनही सुरूच आहे. पेट्रोलने शंभरी ओलांडल्यानंतरही दरवाढ थांबण्याचे नाव घेईना, तर डिझेल शंभरीच्या ...

सांगली : पेट्रोल आणि डिझेलची घोडदौड अजूनही सुरूच आहे. पेट्रोलने शंभरी ओलांडल्यानंतरही दरवाढ थांबण्याचे नाव घेईना, तर डिझेल शंभरीच्या दिशेने वाटचाल करू लागले आहे.

वाहनचालकांसाठी इंधनाची महागाई कंबरडे मोडणारी ठरली आहे. पेट्रोलच्या किमती शंभरी गाठल्यावर तरी स्थिर राहतील अशी अपेक्षा होती; पण अपेक्षा फोल ठरली आहे. मंगळवारी (दि. २२) पेट्रोल चक्क १०४ रुपयांवर पोहोचले. शंभर रुपयांच्या नोटेत ९६० मिली पेट्रोल मिळू लागले आहे. त्यामुळे वाहनचालक हबकले आहेत. सर्वसामान्यांचे पेट्रोलचा महिन्याचा खर्च आटोक्याबाहेर जात आहे. सांगलीत मंगळवारी पेट्रोल प्रतिलीटर १०३.४३ रुपयांनी विकले जात होते. ग्रामीण भागात १०४ रुपयांपर्यंत पोहोचले होते.

स्पीड पेट्रोल प्रतिलीटर १०६.२८ रुपयांवर गेले आहे. ग्रामीण भागात १०७ रुपयांपर्यंत पोहोचले आहे. त्याच्याकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याने पंपचालकांनी विक्री थांबवली असून साध्या पेट्रोलचीच विक्री सुरू आहे.

डिझेलची घोडदौडदेखील वेगाने सुरू आहे. मंगळवारी सांगलीतील दर ९४.०८ रुपये प्रतिलीटर असा होता. ग्रामीण भागात ९४. ५० रुपयांपर्यंत पोहोचले होते. मालवाहतूकदारांसाठी डिझेलची दरवाढ खूपच मोठी डोकेदुखी ठरली आहे. दरवाढीचा वेग पाहता लवकरच डिझेलदेखील शंभरी गाठण्याची चिन्हे आहेत.

चौकट

सांगलीत मंगळवारचे प्रतिलीटरचे दर

पेट्रोल १०३.४३ रुपये

स्पीड पेट्रोल १०६.२८ रुपये

डिझेल ९४.०८ रुपये

चौकट

ग्राहकांना वाली उरला नाही

लॉकडाऊन काळात उत्पन्न घटले असताना इंधन दरवाढीने खिसा हलका होऊ लागल्याने चिंतेत भर पडली आहे. तेल कंपन्या हजारो कोटी रुपयांचा नफा ग्राहकांच्या खिशातून वसूल करू लागल्या आहेत. त्यांच्यावर कोणाचेच नियंत्रण नसल्याचे दुर्दैवी चित्र आहे. यामध्ये ग्राहकांचेच मरण ओढवत आहे.