शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल, डिझेल महिनाभरापासून स्थिर, ग्राहकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:27 IST

सांगली : गेल्या महिनाभरापासून इंधनाचे दर स्थिर आहेत. ग्राहकांसाठी ही बाब दिलासा देणारी ठरली आहे. विशेष म्हणजे सोने आणि ...

सांगली : गेल्या महिनाभरापासून इंधनाचे दर स्थिर आहेत. ग्राहकांसाठी ही बाब दिलासा देणारी ठरली आहे. विशेष म्हणजे सोने आणि चांदीच्या दरात मोठी चढ-उतार होत असतानाही इंधनाचे दर स्थिर राहिले आहेत.

बरोबर महिन्यापूर्वी म्हणजे १८ ऑगस्ट रोजी पेट्रोलचा दर १०७.७२ रुपये होता. त्यामध्ये ७० पैशांची घट होत शनिवारी (दि. १८) १०७.०२ रुपयांना पेट्रोल विकले जात होते. महिनाभरात ७० पैशांची घट म्हणजे मोठा दिलासा देणारी बाब नसली तरी दरवाढ झाली नाही ही महत्त्वाची बाब ठरली आहे.

डिझेलचा भावदेखील स्थिर राहिला आहे. सांगलीत शनिवारी डिझेलचा दर ९४.४७ रुपये प्रतिलिटर होता. ७ सप्टेंबरपासून ६ ते ३२ पैशांचाच कमी-जास्त फरक राहिला. यामुळे मालवाहतूकदारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

गेल्या वर्षभरापासून इंधनाच्या किमती सातत्याने वाढत आहेत. पेट्रोल ९२ रुपयांवरुन १०७ रुपयांवर पोहोचले आहे, तर डिझेल ७९ रुपयांवरुन ९५ रुपयांपर्यंत गेले आहे. गेले वर्षभर इंधनाची भाववाढ दररोजच होत होती. या स्थितीत सप्टेंबरमध्ये दर स्थिर राहिल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

चौकट

पेट्रोल-डिझेलसोबतच सोने व चांदीचे भावदेखील आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतारांवर कमी-जास्त होतात. गेल्या दोन-तीन आठवड्यांत सोने व चांदीची सतत घसरण होत आहे. पेट्रोल-डिझेल मात्र कमी होत नसल्याकडे पंपचालकांनी लक्ष वेधले आहे. सांगलीत शनिवारी पेट्रोल १०७.०२ रुपये प्रतिलिटर तर डिझेल ९४.४७ रुपये प्रतिलिटर असा दर होता.