सांगली : लॉकडाऊनच्या निर्बंधांतील अत्यावश्यक बाबींमध्ये पेट्रोल पंप, पेट्रोलियम उत्पादने, सर्व मालवाहतूक, डेटा केंद्रे, क्लाउड सेवा वितरक, पायाभूत सुविधा, सेवांसाठी आवश्यक माहिती व तंत्रज्ञान सेवा, शासकीय व खासगी सुरक्षा सेवा, फळविक्री यांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी ही माहिती दिली.
पेमेंट सिस्टम ऑपरेटर, वित्तीय बाजार, नॉनबॅकिंग वित्तीय महामंडळे, सूक्ष्म वित्तीय संस्था, वकिलांची कार्यालये, लस व औषधांची वाहतूक, परवानाधारक मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर्स या संस्था, कार्यालयांच्या कर्मचाऱ्यांनी लसीकरण करून घ्यायचे आहे, अन्यथा १५ दिवसांपर्यंत वैध कोरोना चाचणी निगेटिव्ह प्रमाणपत्र सोबत बाळगावे लागेल. प्रमाणपत्र सोबत नसल्यास १ हजार रुपये दंड होईल.
प्रवाशांनी स्थानकापर्यंत किंवा घरापर्यंत प्रवासावेळी तिकीट सोबत बाळगायचे आहे. आौद्योगिक कामगार ओळखपत्राच्या आधारे प्रवास करू शकतील. सर्व प्रार्थनास्थळे बंद राहतील, पण नित्यपूजा सुरू राहील. धार्मिक स्थळी विवाह, अंत्यसंस्कार संबंधित पूजा, प्रार्थना यांना निर्देशांचे पालन करण्याच्या अटीवर परवानगी आहे. परीक्षार्थी विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रासोबत प्रवास करता येईल.
शनिवार, रविवार या संचारबंदी कालावधीत विवाह समारंभांना निर्देशांच्या पालनाच्या अटीवर परवानगी असेल.